नवी दिल्ली : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने रायपूरमध्ये न्यूझीलंडचा आठ विकेट्स राखून पराभव केला. 109 धावांचा पाठलाग करणाऱ्या टीम इंडियासाठी रोहित शर्माने 51 धावांची इनिंग खेळली. पण सामना संपल्यानंतर रोहितकडून त्याच्या फॉर्मवर आणि बरेच दिवस शतक न झळकावण्याबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले. यावर रोहितनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, तो ज्या पद्धतीने खेळत आहे, त्यावरून तो खूश आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये, रोहितने 19 जानेवारी 2020 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध बेंगळुरूमध्ये शेवटचे शतक झळकावले. पण तेव्हापासून आजतागायत त्याची बॅट शांत आहे आणि त्याला एकाही वनडेत शतक झळकावता आलेले नाही.
-
Captain @ImRo45 provided the perfect start to the chase with a fifty and was #TeamIndia's 🔝 performer from the second innings 👌👌
— BCCI (@BCCI) January 21, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
A look at his batting summary ✅ #INDvNZ
Scorecard ▶️ https://t.co/tdhWDoSwrZ @mastercardindia pic.twitter.com/5GYyjhV3tp
">Captain @ImRo45 provided the perfect start to the chase with a fifty and was #TeamIndia's 🔝 performer from the second innings 👌👌
— BCCI (@BCCI) January 21, 2023
A look at his batting summary ✅ #INDvNZ
Scorecard ▶️ https://t.co/tdhWDoSwrZ @mastercardindia pic.twitter.com/5GYyjhV3tpCaptain @ImRo45 provided the perfect start to the chase with a fifty and was #TeamIndia's 🔝 performer from the second innings 👌👌
— BCCI (@BCCI) January 21, 2023
A look at his batting summary ✅ #INDvNZ
Scorecard ▶️ https://t.co/tdhWDoSwrZ @mastercardindia pic.twitter.com/5GYyjhV3tp
खेळ बदलण्याचा प्रयत्न : शतक झळकावता न आल्याच्या प्रश्नावर रोहित शर्मा म्हणाला, की तो आपला खेळ बदलण्याचा प्रयत्न करत आहे. सुरुवातीपासूनच गोलंदाजांवर दबाव आणत आहे. विरोधी संघावर दडपण आणणे खूप गरजेचे असते. तो म्हणाला, मला माहित आहे की मोठे स्कोअर आले नाहीत, पण त्याला फारशी चिंता नाही. मी माझ्या फलंदाजीवर समाधानी आहे, माझा दृष्टीकोन चांगला आहे. मी ज्याप्रकारे कामगिरी करत आहे, त्यामुळे मी खूप आनंदी आहे. आता मोठी धावसंख्याही जवळ आली आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाला आशा आहे की, कर्णधार रोहित लवकरच फॉर्ममध्ये येईल. रोहितला एक दिवसीय क्रिकेटचा दिग्गज खेळाडू मानला जातो. त्याने वनडेमध्ये 10,000 धावाही पूर्ण केल्या आहेत.
-
Rohit Sharma as a captain in ODI:
— Johns. (@CricCrazyJohns) January 21, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Innings - 23
Runs - 1019
Average - 56.61
Strike Rate - 101.79 pic.twitter.com/VYQzvbj8os
">Rohit Sharma as a captain in ODI:
— Johns. (@CricCrazyJohns) January 21, 2023
Innings - 23
Runs - 1019
Average - 56.61
Strike Rate - 101.79 pic.twitter.com/VYQzvbj8osRohit Sharma as a captain in ODI:
— Johns. (@CricCrazyJohns) January 21, 2023
Innings - 23
Runs - 1019
Average - 56.61
Strike Rate - 101.79 pic.twitter.com/VYQzvbj8os
एकदिवसीय सामन्यांतील कारकीर्द : रोहितची एकदिवसीय कारकीर्द 2007 मध्ये भारतासाठी एकदिवसीय आणि टी 20 मध्ये पदार्पण करणारा रोहित शर्मा सध्याच्या युगातील दिग्गज फलंदाजांपैकी एक आहे. त्याने भारतासाठी पहिले एकदिवसीय शतक 2010 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध बुलावायो येथे झळकावले. 2013 मध्ये, त्याने प्रथमच ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावले. आतापर्यंत एकदिवसीय सामन्यांमध्ये विक्रमी तीन द्विशतके झळकावली. शतकानंतर शेवटच्या 15 डावांत त्याने 28, 25, 37, 60, 5, 13, 76, 0, 17, 27, 51, 83, 17, 42, 34 धावा केल्या. रोहितने 2022 मध्ये भारतासाठी आठ एकदिवसीय सामने खेळले. यादरम्यान त्याने 41.50 च्या सरासरीने 249 धावा काढल्या. त्याचा स्ट्राइक रेट 114.22 होता आणि सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 76 होती.
हेही वाचा : Shubman Gill Double Century : शुभमन गिल वनडेमध्ये द्विशतक झळकावणारा 5वा भारतीय, अनेक विक्रमांना गवसणी