लंडन - भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात धारदार गोलंदाजी करत आपण लयीत आल्याचे सांगितलं आहे. यादरम्यान, इंग्लंडचा धाकड फलंदाज जॉनी बेअरस्टो याने जसप्रीत बुमराहचे कौतुक केले.
जॉनी बेअयरस्टो म्हणाला की, जसप्रीत बुमराहकडे क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात गोलंदाजी करण्याचे अद्भभूत कौशल्य आहे. मी तुम्हाला बुमराहविषयीच्या चर्चेबाबत सर्व काही सांगू शकत नाही. परंतु आम्ही जाणतो की, बुमराहकडे अद्भभूत कौशल्य आहे. तो अॅक्शनसोबत क्रीजचा देखील वापर करतो आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की, तिची अॅक्शन आणि रनअप थोडासा वेगळा आहे.
बुमराहने फक्त 20-21 कसोटी सामने खेळली आहेत. मागील मालिका पाहता यातील 6 सामने तर त्याने इंग्लंडविरुद्ध खेळली आहेत. तो परिस्थिती पाहून आपल्या कौशल्यात बदल करतो. याचे श्रेय बुमराह दिलं पाहिजे. तो एक जागतिक स्तराचा गोलंदाज आहे. आयपीएलमध्ये, भारताकडून खेळताना व्हाइट चेंडूवर खेळताना आणि कसोटी क्रिकेटमध्ये खेळताना त्याला शानदार कामगिरी करताना पाहिलं असल्याचे देखील बेअरस्टो म्हणाला.
2012 मध्ये पदार्पण करत आतापर्यंत 75 कसोटी सामने खेळणारा 31 वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज बेअरस्टोच्या मते, भारतीय गोलंदाजाविरुद्ध त्याची कामगिरी खेळपट्टीवर निर्भर करते. त्याने सांगितंल की, त्याला या मालिकेत अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसन आणि भारताचा कर्णधार विराट कोहली यांच्यातील दंद्वची आशा आहे.
दरम्यान, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जसप्रीत बुमराहला गडी बाद करता आलेले नव्हते. यामुळे त्याच्यावर टीकेची झोड उठली होती. त्यानंतर त्याने इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात 5 आणि दुसऱ्या डावात 4 असे संपूर्ण सामन्यात 9 गडी बाद केले. त्याने या कामगिरीच्या जोरावर टीकाकारांची तोंडे बंद केली.
हेही वाचा - नीरज चोप्राचा सन्मान; देशात दरवर्षी 7 ऑगस्ट हा दिवस भालाफेक दिन म्हणून साजरा करण्यात येणार
हेही वाचा - Eng vs Ind: भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघात मोईन अलीची वापसी