मुंबई Virat Kohli : भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं न्यूझीलंड विरुद्ध वनडे विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत त्याच्या वनडे कारकिर्दीतील ५० वं शतक झळकावलं. आता तो क्रिकेटच्या या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणारा फलंदाज बनला आहे. त्यानं भारतीय संघाचा माजी दिग्गज भारतरत्न सचिन तेंडुलकरचा ४९ एकदिवसीय शतकांचा विक्रम मोडला.
-
At the top of the world 🎇
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) November 15, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Virat Kohli slams a record 50th ODI ton 🎉@mastercardindia Milestones 🏏#CWC23 | #INDvNZ pic.twitter.com/wxsHsnWxwL
">At the top of the world 🎇
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) November 15, 2023
Virat Kohli slams a record 50th ODI ton 🎉@mastercardindia Milestones 🏏#CWC23 | #INDvNZ pic.twitter.com/wxsHsnWxwLAt the top of the world 🎇
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) November 15, 2023
Virat Kohli slams a record 50th ODI ton 🎉@mastercardindia Milestones 🏏#CWC23 | #INDvNZ pic.twitter.com/wxsHsnWxwL
विश्वचषकातील तिसरं शतक : एवढेच नाही तर आता कोहली वनडे वर्ल्ड कपच्या एका मोसमात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्यानं सचिनला मागं टाकलं. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारतासाठी शतक झळकावणारा कोहली आता सौरव गांगुलीनंतरचा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. कोहलीनं २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकातील हे तिसरं शतक आहे. साखळी सामन्यांमध्ये त्यानं दोन शतकं झळकावली होती. आता न्यूझीलंडविरुद्धच्या या महत्त्वाच्या सामन्यात त्यानं तिसरं शतक झळकावलं. विराट कोहलीनं १०६ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. या दरम्यान त्यानं १ षटकार आणि ८ चौकार लगावले. हे शतक झळकावल्यानंतर स्वतः सचिननं विराट कोहलीचं अभिनंदन केलं.
-
History made in Mumbai as Virat Kohli overtakes Sachin Tendulkar's long-standing record for ODI centuries 😲#CWC23 | #INDvNZhttps://t.co/nOKT58iRjX
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) November 15, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">History made in Mumbai as Virat Kohli overtakes Sachin Tendulkar's long-standing record for ODI centuries 😲#CWC23 | #INDvNZhttps://t.co/nOKT58iRjX
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) November 15, 2023History made in Mumbai as Virat Kohli overtakes Sachin Tendulkar's long-standing record for ODI centuries 😲#CWC23 | #INDvNZhttps://t.co/nOKT58iRjX
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) November 15, 2023
सर्वाधिक एकदिवसीय शतके :
- विराट कोहली (भारत) - ५०
- सचिन तेंडुलकर (भारत) - ४९
- रोहित शर्मा (भारत) - ३१
- रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) - ३०
- सनथ जयसूर्या (श्रीलंका) - २८
विश्वचषकाच्या मोसमात सर्वाधिक धावा : आता एकदिवसीय विश्वचषकाच्या एकाच मोसमात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आला आहे. न्यूझीलंडविरुद्ध ८० धावा करताच तो सचिन तेंडुलकरला मागे टाकून त्याच्या पुढे गेला. सचिन तेंडुलकरने २००३ साली वनडे वर्ल्ड कपच्या एकाच मोसमात सर्वाधिक ६७३ धावा केल्या होत्या. कोहलीनं सचिन तेंडुलकरचा २० वर्ष जुना विक्रम मोडला आणि आता तो विश्वचषकाच्या एकाच मोसमात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे.
विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा :
- विराट कोहली (२०२३) - ७११ धावा
- सचिन तेंडुलकर (२००३) - ६७३ धावा
- मॅथ्यू हेडन (२००७) - ६५९ धावा
- रोहित शर्मा (२०१९) - ६४८ धावा
- डेव्हिड वॉर्नर (२०१९) - ६४७ धावा
- शकिब अल हसन (२०१९) - ६०६ धावा
हेही वाचा :