दिल्ली Cricket World Cup 2023 : क्रिकेट विश्वचषकात आज भारताचा मुकाबला अफगाणिस्तानशी होता. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअमवर हा सामना खेळला गेला. भारतानं या सामन्यात अफगाणिस्तानचा ८ गडी राखून दारूण पराभव केला. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्ताननं ५० षटकांत २७२-८ धावा केल्या. भारतानं हे लक्ष ३५ षटकातच गाठलं.
रोहितचं शतक : कर्णधार रोहित शर्मा आज तुफान फार्मात होता. त्यानं ८४ चेंडूत १६ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीनं १३१ धावा ठोकल्या. त्याला राशिद खाननं बाद केलं. सलामीवीर इशान किशननं त्याला चांगली साथ दिली. तो ४७ चेंडूत ४७ धावा करून राशिदच्याचं गोलंदाजीत बाद झाला. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी १५६ धावांची भागिदारी केली. हे दोघं बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यरनं सामन्याची सूत्र आपल्या हाथी घेतली. या दोघांनी शेवटपर्यंत नाबाद राहत भारताला ८ गड्यांनी मोठा विजय मिळवून दिला. विराटनं ५६ चेंडूत नाबाद ५५ धावांची खेळी केली, तर अय्यरनं २३ चेंडूत २५ धावा केल्या.
जसप्रीत बुमराहच्या ४ विकेट : प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्ताननं ५० षटकांत ८ गड्यांच्या मोबदल्यात २७२ धावा केल्या. कर्णधार हशमतुल्ला शाहिदीनं ८८ चेंडूत सर्वाधिक ८० धावांच योगदान दिलं. अजमतुल्ला उमरझाईनं ६९ चेंडूत ६२ धावा केल्या. अफगाणिस्तानचे इतर फलंदाज काही आपला प्रभाव पाडू शकले नाही. भारताकडून जसप्रीत बुमराहनं १० षटकांत ३९ धावा देत ४ विकेट घेतल्या. हार्दिक पांड्यानं २ बळी घेतले.
दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन :
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह
अफगाणिस्तान : हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), रहमानउल्लाह गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, अजमतुल्ला उमरझाई, राशिद खान, मुजीब उर रहमान, फजलहक फारुकी, नवीन उल हक
अश्विनच्या जागी शार्दुल ठाकूर : या आधी २०१९ च्या विश्वचषकात भारत आणि अफगाणिस्तान आमनेसामने आले होते. या सामन्यात अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंनी भारतीय फलंदाजांची दमछाक केली होती. या सामन्यात भारतानं ११ धावांनी निसटता विजय मिळवता होता. आता नियमित सलामीवीर शुभमन गिलच्या अनुपस्थितीत धावा करण्याची जबाबदारी इशान किशनच्या खांद्यावर आहे. आजच्या सामन्यासाठी टीम इंडियात रविचंद्रन अश्विनच्या जागी शार्दुल ठाकूरची वर्णी लागल. अफगाणिस्तानच्या संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
हेही वाचा :
- FIFA World Cup Host : कतारनंतर आशियातील आणखी एका देशात रंगणार फिफा वर्ल्डकपचा थरार? 'या' देशानं ठोकला यजमानपदाचा दावा
- Cricket World Cup २०२३ : अफगाणिस्तानविरुद्ध घरच्या मैदानावर सामना, विराट कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा
- Cricket World Cup 2023 : 'भावानं सर्वोत्तम कामगिरी करून विश्वचषक जिंकवून द्यावा'; रविंद्र जडेजाच्या बहिणीची 'ETV भारत'शी खास बातचीत