ETV Bharat / sports

Cricket World Cup 2023 : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; शुभमन गिल पाकिस्तानविरुद्ध खेळण्याची शक्यता

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 13, 2023, 9:36 AM IST

Updated : Oct 13, 2023, 1:02 PM IST

Cricket World Cup 2023 : क्रिकेट विश्वचषक 2023 च्या 14 ऑक्टोबर रोजी खेळल्या जाणार्‍या भारत विरुद्ध पाकिस्तान या सर्वात हाय-व्होलटेज सामन्यापूर्वी 'टीम इंडिया'च्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आलीय.

Cricket World Cup 2023
Cricket World Cup 2023

अहमदाबाद Cricket World Cup 2023 : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आलीय. भारतीय संघाचा युवा सलामी फलंदाज शुभमन गिलनं सरावाला सुरुवात केलीय. ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या सामन्याआधी शुभमन गिलला डेंग्यूची लागण झाली होती. तसंच त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्येही दाखल करण्यात आलं होतं. त्यामुळं त्याला दोन सामन्याला मुकावं लागलं. यानंतर आजारातून बरं होत शुभमन गिल अहमदाबादमध्ये दाखल झालाय. तसंच त्यानं सरावालाही सुरुवात केलीय. भारतीय संघही पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी अहमदाबादमध्ये दाखल झालाय.

पाकिस्तानविरुद्ध गिल करणार पुनरागमन : युवा सलामीवीर शुभमन गिल याची प्रकृती सुधारली असून अहमदाबादला दाखल झाल्यानंतर त्यानं सरावालाही सुरुवात केलीय. शनिवारी 14 ऑक्टोबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअवर सामना होणार आहे. त्यासाठी गिलनं तयारी सुरु केलीय. बीसीसीआयची मेडिकल टीम शुभमन गिलवर लक्ष ठेवून आहे. यामुळं पाकिस्तानविरोधात शुभमन गिल मैदानावर उतरणार का? याकडं सर्वच भारतीय चाहत्यांचं लक्ष लागलंय. मागील वर्षभरापासून शुभमन गिल उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या सामन्यात गिलची अनुपस्थिती भारतीय संघाला प्रकर्षाने जाणवली. त्यामुळं गिलच्या कमबॅककडे सर्वच क्रीडाप्रेमींचं लक्ष लागलंय.

गिलऐवजी किशनला संधी : भारताचा सलामी फलंदाज शुभमन गिलला विश्वचषकाच्या पहिल्या सामन्याआधी डेंग्यूची लागण झाली होती. त्यामुळं ऑस्ट्रेलियाविरोधात तो खेळू शकला नाही. गिलच्या जागी ईशान किशनला संधी देण्यात आली होती. पण पहिल्याच सामन्यात ईशान किशन शून्यावर बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात ईशान किशननं 47 धावांची खेळी केली. शुभमन गिलनं मागील वर्षभरात धावांचा डोंगर रचला होता. प्रचंड फॉर्ममध्ये असणारा गिल संघात नसल्याची भारतीय संघाला कमतरता जाणवत आहे. हाय व्होलटेज पाकिस्तानविरोधाच्या सामन्यात शुभमन गिल टीम इंडियात कमबॅक करण्याची शक्यता आहे.

गिलची आतापर्यंतची कामगिरी : गिलनं आतापर्यंत खेळलेल्या 35 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1917 धावा केल्या आहेत. यामध्ये त्यानं 6 शतकं आणि 9 अर्धशतकं झळकावली आहेत. 208 धावा हा गिलचा एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम स्कोअर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत शुभमननं चमकदार कामगिरी केली होती. इंदूर वनडेत त्यानं शतक झळकावलं होत. याआधी त्यानं मोहालीत 74 धावांची इनिंग खेळली होती.

हेही वाचा :

  1. 45 Special Gayle : 'तो' रेकॉर्ड तोडताच 'युनिव्हर्स बॉस'नं 'हिटमॅन'चं केलं खास शैलीत अभिनंदन
  2. Cricket World Cup Kane Williamson available : केन विल्यमसन बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यासाठी सज्ज
  3. ICC CWC 2023 India vs Pakistan : भारत की पाकिस्तान? कोण जिंकणार 'हाय-व्होल्टेज' सामना? काय आहे आजपर्यंतचा इतिहास, वाचा...

Last Updated : Oct 13, 2023, 1:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.