नवी दिल्ली : क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी बातमी आहे. बीसीसीआयने 2023 विश्वचषकासाठी तिकीट बुकिंगची तारीख जाहीर केली आहे. आगामी विश्वचषकाची तिकिटे 10 ऑगस्टपासून ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध केली जातील. या सोबतच बोर्डाने विश्वचषकादरम्यान स्टेडियममध्ये मोफत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
-
Updates on World Cup 2023:- (To Indian Express)
— CricketMAN2 (@ImTanujSingh) July 28, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
•Tickets sale set to start on 10th Aug.
•Entire ground covered in the rain time.
•BCCI tied up with Coca-Cola to provide free water.
•ICC & BCCI will get 300 hospitality tickets per game.
•State provide tickets to BCCI & ICC. pic.twitter.com/3gyXwzrKIl
">Updates on World Cup 2023:- (To Indian Express)
— CricketMAN2 (@ImTanujSingh) July 28, 2023
•Tickets sale set to start on 10th Aug.
•Entire ground covered in the rain time.
•BCCI tied up with Coca-Cola to provide free water.
•ICC & BCCI will get 300 hospitality tickets per game.
•State provide tickets to BCCI & ICC. pic.twitter.com/3gyXwzrKIlUpdates on World Cup 2023:- (To Indian Express)
— CricketMAN2 (@ImTanujSingh) July 28, 2023
•Tickets sale set to start on 10th Aug.
•Entire ground covered in the rain time.
•BCCI tied up with Coca-Cola to provide free water.
•ICC & BCCI will get 300 hospitality tickets per game.
•State provide tickets to BCCI & ICC. pic.twitter.com/3gyXwzrKIl
क्रीडाप्रेमींना मोठा दिलासा मिळणार : बीसीसीआयच्या या निर्णयामुळे क्रीडाप्रेमींना मोठा दिलासा मिळणार आहे. सामन्यांदरम्यान मोफत पिण्याचे पाणी देण्याच्या निर्णयाचे कौतुक होत आहे. ऑक्टोबरच्या अखेरीस भारतात वर्ल्डकप होत आहे. त्या दरम्यान अनेक ठिकाणी चाहत्यांसाठी असलेल्या सुविधा आणि सेवांबाबत विविध प्रश्न उपस्थित केले जात होते. त्याच अनुषंगाने आता बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी चाहत्यांना मोफत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे.
-
The tickets of World Cup 2023 sale in online set to start on 10th August. (To Indian Express) pic.twitter.com/WYHtmDYQEO
— CricketMAN2 (@ImTanujSingh) July 28, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">The tickets of World Cup 2023 sale in online set to start on 10th August. (To Indian Express) pic.twitter.com/WYHtmDYQEO
— CricketMAN2 (@ImTanujSingh) July 28, 2023The tickets of World Cup 2023 sale in online set to start on 10th August. (To Indian Express) pic.twitter.com/WYHtmDYQEO
— CricketMAN2 (@ImTanujSingh) July 28, 2023
बीसीसीआय कोका कोलासोबत भागीदारी करणार : बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले की, बोर्ड चाहत्यांना मोफत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यावर काम करत आहे. चाहत्यांना मोफत पिण्याचे पाणी देण्यासाठी BCCI कोका कोलासोबत भागीदारी करण्यास उत्सुक आहे. जय शहा यांनी विविध राज्य संघटनांच्या प्रमुखांसोबत घेतलेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीत विविध संघटनांकडून फीडबॅक घेण्यात आला होता.
स्टेडियमच्या सुविधा वाढवल्या जातील : बैठकीत मोफत पिण्याच्या पाण्यासह, हाउसकीपिंग, स्वच्छतागृहे आणि क्रिकेट स्टेडियमची स्वच्छता राखण्यावरही चर्चा झाली. या सोबतच, क्रीडाप्रेमींना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी तिकिटांच्या किंमती आणि वेळापत्रकावरही चर्चा करण्यात आली आहे. यापूर्वी स्टेडियममध्ये चाहत्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधांबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. तिकीट खरेदीच्या अनुभवापासून ते स्टेडियमच्या स्वच्छतेपर्यंत अनेक वेळा चाहत्यांनी आपली निराशा व्यक्त केली आहे. आता विश्वचषकासारख्या स्पर्धेचे आयोजन भारतात केले जात असल्याने, चाहत्यांना आनंदी ठेवण्यासाठी स्टेडियमच्या सुविधा वाढवल्या जातील अशी अपेक्षा आहे.
तिकीट विक्रीची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल होणार नाही : यापूर्वी तिकीट विक्रीची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल बनविण्याची चर्चा होती. मात्र बीसीसीआयने तुर्तास या योजनेतून माघार घेतली आहे. ऑनलाइन तिकिटे डुप्लिकेट होण्याची भीती बीसीसीआयला आहे. हे टाळण्यासाठी त्यांनी सध्याचे तिकीट मॉडेलच सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. वर्ल्ड कप 2023 ची सुरुवात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सामन्याने होईल. अंतिम सामना देखील येथेच खेळवला जाणार आहे.
हेही वाचा :