हैदराबाद: आयसीसी महिला विश्वचषक 2022 ( ICC Women's World Cup 2022 ) च्या स्पर्धेत मंगळवारी (22 मार्च) दोन सामने पार पडले. यातील पहिला सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात झाला. दुसरा सामना भारत विरुद्ध बांगलादेश ( India v Bangladesh ) यांच्यात झाला. या दोन्ही सामन्यात अनुक्रमे ऑस्ट्रेलिया आणि भारताने विजय मिळवला. या दोन सामन्याच्या निकालानंतर गुणतालिकेत फेरबदल झाले आहेत.
-
The race for the #CWC22 semi-finals spots heats up 🔥 pic.twitter.com/Lz4ZhLnXcW
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) March 22, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">The race for the #CWC22 semi-finals spots heats up 🔥 pic.twitter.com/Lz4ZhLnXcW
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) March 22, 2022The race for the #CWC22 semi-finals spots heats up 🔥 pic.twitter.com/Lz4ZhLnXcW
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) March 22, 2022
ऑस्ट्रेलिया पूर्वीप्रमाणेच गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर असून उपांत्य फेरीतील त्यांचे स्थान आधीच निश्चित झाले होते. त्याचबरोबर भारताने विजयानंतर एका स्थानाने झेप घेत तिसरे स्थान पटकावले आहे. तसेच आता मिताली राजच्या नेतृत्वाखालील टीम इंडियासाठी उपांत्य फेरीत जाणे खूप सोपे झाले आहे. मात्र उपांत्य फेरीतील तीन संघ अद्याप निश्चित झालेले नाहीत.
आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेची गुणतालिका -
स्थान | संघ | सामने | विजय | पराभव | कोणताही परिणाम नाही | गुण | नेट रन रेट |
1 | ऑस्ट्रेलिया (Q) | 6 | 6 | 0 | 0 | 12 | 1.287 |
2 | दक्षिण अफ्रिका | 5 | 4 | 1 | 0 | 8 | 0.092 |
3 | भारत | 6 | 3 | 3 | 0 | 6 | 0.768 |
4 | वेस्टइंडिज | 6 | 3 | 3 | 0 | 6 | -0.885 |
5 | इंग्लंड | 5 | 2 | 3 | 0 | 4 | 0.327 |
6 | न्यूझीलंड | 6 | 2 | 4 | 0 | 4 | -0.229 |
7 | बांगलादेश | 5 | 1 | 4 | 0 | 2 | -0.754 |
8 | पाकिस्तान | 5 | 1 | 4 | 0 | 2 | -0.878 |
सहा सामन्यांमधला भारताचा हा तिसरा विजय ( India third victory ) असून सहा गुण झाले आहेत. भारत पॉइंट टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेनंतर तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. भारतीय संघाचा नेट रनरेटही सुधारला आहे. भारताचा निव्वळ रन रेट +0.768 आहे, जो ऑस्ट्रेलियानंतरचा सर्वोत्तम आहे. भारत 27 मार्च रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा साखळी सामना खेळणार आहे. या सामन्यातून उपांत्य फेरीतील तिसरा आणि चौथा संघ कोणता असेल हे निश्चित होईल.
भारतापूर्वी दक्षिण आफ्रिकेला 24 मार्चला वेस्ट इंडिजचा सामना ( West Indies match on March 24 ) करायचा आहे. यामध्ये दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला, तर तो अंतिम-4 मध्ये जाईल. यासोबतच भारताचे आगमनही जवळपास निश्चित होणार आहे. सध्या वेस्ट इंडिज सहा सामन्यांत तीन विजयांसह चौथ्या क्रमांकावर आहे. पण त्याचा नेट रन रेट मायनसमध्ये आहे, ज्यामुळे त्यांचा खेळ खराब होऊ शकतो.
इंग्लंडचा संघही अंतिम-4मध्ये जाण्याचा दावेदार आहे. त्यांचे अजून दोन सामने बाकी आहेत. पाच सामन्यांत दोन विजयांसह चार गुणांनी तो पाचव्या क्रमांकावर आहे. त्यांचा नेट रन रेटही चांगला आहे. या दृष्टीने शेवटच्या वेळेचा हा संघ अंतिम-4 मध्ये जाण्याचे कोणा एकाचे तरी तिकीट कापू शकतो.