ETV Bharat / sports

Womens World Cup 2022: ऑस्ट्रेलियाने लगावला विजयाचा षटकार; दक्षिण आफ्रिकेवर पाच विकेट्सने केली मात - क्रिकेटच्या मराठी अपडेट्स

आयसीसी महिला विश्वचषक 2022 मधील 21 व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने दक्षिण आफ्रिकेला पाच विकेट्सने मात (Australia Women won by 5 wkts ) दिली आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला आपल्या पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले.

Australia
Australia
author img

By

Published : Mar 22, 2022, 12:33 PM IST

बेसिन रिझर्व्ह (वेलिंग्टन): आयसीसी महिला विश्वचषक 2022 ( ICC Women's World Cup 2022 ) मधील 21 वा सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघात बेसिन रिझर्व्ह येथे पार पडला. या सामन्यात मेग लॅनिंगच्या कर्णधार खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा पाच गडी राखून पराभव केला. त्याचबरोबर या स्पर्धतील आपल्या सलग सहाव्या विजयाची नोंद केली. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाला दक्षिण आफ्रिकेने 272 धावांचे लक्ष्य दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 45.2 षटकात 5 गडी लक्ष्य पूर्ण केले. उपांत्य फेरीत आधीच आपले स्थान पक्के करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाचे सहा सामन्यांतून 12 गुण ( Australian team 12 points ) झाले आहेत. त्यामुळे कांगारू संघाने गुणतालिकेत अव्वल स्थान आणखी मजबूत केले आहे.

स्पर्धेतील दक्षिण आफ्रिकेचा पहिला पराभव -

दरम्यान दक्षिण आफ्रिका संघाला या स्पर्धेत प्रथमच पराभवाचा सामना ( South Africa first defeat ) करावा लागाला. या संघाची पाच सामन्यातील हा पहिलाच पराभव आहे. हा संघ चार सामने जिंकून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. तत्पुर्वी ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीसाठी दक्षिण आफ्रिका संघाला आमंत्रित केले होते. दक्षिण आफ्रिकेची सलामीवीर लॉरा वॉलवॉर्ट आणि कर्णधार सन लुस यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने 5 बाद 271 धावा केल्या होत्या.

वॉलवॉर्टने 134 चेंडूत 90, तर लुसने 51 चेंडूत 52 धावा केल्या. लॉराने आपल्या खेळीत सहा चौकार मारले, तर लुसनेही तेवढेच चौकार मारले. ऑस्ट्रेलियाकडून मेगन शुट, जोनासेन, गार्डनर, सदरलँड आणि अलाना किंग यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

मेग लॅनिंगची नाबाद शतकी खेळी -

लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात चांगली झाली नाही. संघाने 45 धावांच्या एकूण धावसंख्येवर दोन्ही सलामीवीरांच्या विकेट्स गमावल्या होत्या. यानंतर मेग लॅनिंगने इतर फलंदाजांसह छोट्या पण उपयुक्त भागीदारी करत संघाला लक्ष्यापर्यंत नेले. यामध्ये मेग लॅनिंग 130 चेंडूत 15 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद 135 धावा करून परतली.

लॅनिंगने बेथ मुनीसह तिसऱ्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी ( 60-run partnership third wicket ) केली. मॅकग्रासोबत लॅनिंगने चौथ्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी केली. लॅनिंग आणि ऍशले गार्डनर यांच्यात 43 धावांची भागीदारी झाली. त्याचवेळी सदरलँडसोबत पाचव्या विकेटसाठी दोन्ही फलंदाजांनी नाबाद 31 धावांची भागीदारी केली. तालिया मॅकग्राने 32 धावा केल्या, तर गार्डनर 22 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. अॅनाबेल सदरलँडने नाबाद 22 धावा केल्या. बेथ मुनी 23 चेंडूत 21 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. दक्षिण आफ्रिकेकडून शबनम इस्माईल आणि चोले ट्रायॉनने 2-2 बळी घेतले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.