दुबई - आयसीसीने ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. यात ऋषभ पंतने आपली छाप सोडलेली पाहायला मिळत आहे. विराट कोहली आहे, त्या स्थानावर कायम आहे.
आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन ९१९ गुणांसह पहिल्या स्थानावर कायम आहे. तर दुसऱ्या स्थानी ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ आहे. त्याच्या खात्यात ८९१ गुण जमा आहेत. तिसऱ्या स्थानी मार्नस लाबुशेन हा आहे. चौथे स्थान इंग्लंडचा कर्णधार जो रुटने पटकावले आहे. तर भारताचा कर्णधार विराट कोहली पाचव्या स्थानावर कायम आहे. विराटचे ८१४ गुण आहेत.
ऋषभ पंतची क्रमवारीत भरारी -
आयसीसीच्या ताज्या फलंदाजी क्रमवारीनुसार, ऋषभ पंतने सहावे स्थान काबीज केले आहे. आजघडीपर्यंत धोनीला देखील सहावे स्थान काबीज करता आलेले नाही. पंत अशी कामगिरी करणारा भारताचा पहिला यष्टीरक्षक ठरला आहे. पंतच्या नावे ७४७ गुण आहेत.
पंतनंतर या यादीत सातव्या स्थानावर हेन्री निकोलस आणि रोहित शर्मा संयुक्तपणे आहेत. यानंतर बाबर आझम आणि डेव्हिड वॉर्नरचा नंबर लागतो. भारतीय संघाचे अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे अनुक्रमे १४ आणि १५ व्या स्थानावर आहेत.
हेही वाचा - IPL २०२१ : आपल्या सलामीवीर जोडीदाराकडून यशस्वी जैस्वालला मिळालं खास गिफ्ट, पाहा फोटो
हेही वाचा - IPL २०२१ : इंग्लंडचे ११ पैकी ८ खेळाडू मायदेशी परतले
Conclusion: