ETV Bharat / sports

ICC ODI World Cup 2023 : दक्षिण आफ्रिकेचा 102 धावानं दणदणीत विजय - World Cup 2023

ICC ODI World Cup 2023 : विश्वचषक 2023 चा चौथा सामना दक्षिण आफ्रिका, श्रीलंका यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं विक्रमी 102 धावांनी सामना जिंकलाय. आफ्रिकन संघानं प्रथम फलंदाजी करताना 428 धावा करून इतिहास रचला. मात्र, प्रत्युत्तरात श्रीलंकेनंही चांगला खेळ करत 326 धावांपर्यंत मजल मारली. श्रीलंकन संघ मोठी धावसंख्या करेल असं वाटत होतं, पण शेवटी दक्षिण आफ्रिकेनं हा सामना 102 धावांनी जिंकलाय.

ICC ODI World Cup 2023
ICC ODI World Cup 2023
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 7, 2023, 3:11 PM IST

Updated : Oct 7, 2023, 10:30 PM IST

दिल्ली ICC ODI World Cup 2023 : दक्षिण आफ्रिकेनं एकदिवसीय विश्वचषक 2023 ची सुरुवात विजयानं केलीय. पहिल्या सामन्यात आफ्रिकेनं श्रीलंकेचा 102 धावांनी पराभव केलाय. या सामन्यात आफ्रिकेकडून तीन शतके झळकली, ज्यामध्ये एडन मार्करामनं 49 चेंडूत एकदिवसीय विश्वचषकातील सर्वात जलद शतक झळकावलं. याशिवाय क्विंटन डी कॉक आणि रॅसी व्हॅन डर डुसेन यांनीही शतकी खेळी खेळली. आफ्रिकेनं प्रथम फलंदाजी करत 50 षटकांत एकूण 428/5 धावा केल्या. याला प्रत्युत्तरात श्रीलंका 326 धावांवर ऑलआऊट झाली.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका चौथा सामना : आयसीसी क्रिकेट विश्वचषकाचा चौथा सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात गेला. आयसीसी क्रिकेट विश्वचषकाच्या चौथ्या सामन्यात श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉक, ड्युसेन, एडन मार्कराम यांच्या खेळाच्या जोरावर 50 षटकांत 5 गडी गमावून 428 धावा केल्या.

एडन मार्करामनं 106 धावांची तुफानी खेळी : प्रत्युत्तरादाखल श्रीलंकेचा संघ एकवेळ मजबूत स्थितीत होता, पण दक्षिण आफ्रिकेनं पुन्हा एकदा सान्यात चांगली कामगिरी केलीय. दक्षिण आफ्रिकेकडून रॅसी व्हॅन डर ड्युसेननं सर्वाधिक 108 धावा केल्या. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात क्विंटन डी कॉकनं 100 धावांची, तर एडन मार्करामनं 106 धावांची तुफानी खेळी केली. श्रीलंकेकडून दिलशान मदुशंकाने सर्वाधिक दोन बळी घेतले.

204 धावांची भागीदारी : प्रथम फलंदाजीला आलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात जेमतेमच होती. कर्णधार टेंबा बावुमाच्या रूपानं संघाने पहिली विकेट गमावली. पण यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉक, ड्युसेन यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 204 धावांची भागीदारी झाली. दरम्यान क्विंटननं शतक झळकावलं. 84 चेंडूत 100 धावा करून तो बाद झाला. ड्युसेननं 110 चेंडूत 108 धावांची खेळी खेळली. यानंतर एडन मार्करामनं तुफानी खेळी करत विश्वचषकातील सर्वात वेगवान शतक झळकावलं.

विश्वचषकात सर्वोच्च धावसंख्या : दक्षिण आफ्रिकेच्या संघानं विश्वचषकात सर्वोच्च धावसंख्या उभारली. पहिल्यांदाच विश्वचषकाच्या सामन्यात तीन शतकं झळकवणारा दक्षिण अफ्रिका पहिला संघ ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेनं सामन्यात यावेळी 14 षटकार लगावले. दक्षिण आफ्रिकेच्या संघानं जेराल्ड कोएत्झी, मार्को जॅनसेन, केशव महाराज, लुंगी एनगिडी या 4 गोलंदाजांसह मैदानात उतरले.

  • 21: 52

श्रीलंकेनं आठवी विकेट गमावली : कर्णधार दासुन शनाकाच्या रूपाने श्रीलंकेच्या संघाला आठवा धक्का बसला. 62 चेंडूत 68 धावा करून शनाका केशव महाराजचा बळी ठरला. केशवने शनाकाला क्लीन बोल्ड केले.

  • 21:33

श्रीलंकेनं 7 विकेट गमावल्या : 35 षटकांनंतर श्रीलंकेने 244 धावा केल्या. 35 षटकांनंतर श्रीलंकेने 7 विकेट गमावून 244 धावा केल्या. आता संघाला 84 चेंडूत 188 धावांची गरज आहे. सध्या श्रीलंकेकडून कर्णधार दासुन शनाकानं 31 धावा केल्या असून कुसन राजीथा 7 धावा केल्या आहेत.

  • 20:21 PM

श्रीलंकेला पाचवा धक्का बसला :

डावाच्या 12व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर श्रीलंकेच्या संघाला पाचवा धक्का बसला आहे. केशव महाराजने 11 धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर धनंजय डी सिल्वाला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

  • 19:26 PM

श्रीलंकेनं दुसरी विकेट गमावली :

429 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघानं दुसरी विकेट गमावली आहे. 15 चेंडूत 7 धावा करून कुसल परेरा मार्को जॅनसेनचा दुसरा बळी ठरला.

  • 19:5 PM

श्रीलंकेला पहिला धक्का बसला :

पथुम निसांकाच्या रूपानं श्रीलंकेच्या संघाला पहिला धक्का बसलाय. निसांका वैयक्तिक शून्यावर मार्को जॅनसेनची बळी ठरलाय.

  • 18:19 PM

दक्षिण आफ्रिकेनं दिलं श्रीलंकेला 429 धावांचं लक्ष्य :

दक्षिण आफ्रिकेनं 50 षटकांत 5 गडी गमावून 428 धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना क्विंटन डी कॉक, रॅसी व्हॅन डेर ड्युसेन आणि एडन मार्कराम यांच्या झंझावाती शतकांमुळं ही धावसंख्या उभारली. आता हा सामना जिंकण्यासाठी श्रीलंकेला 429 धावा कराव्या लागतील.

  • 17 : 27 PM

मार्करामनं अर्धशतक झळकावलं :

दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करामनं अर्धशतक झळकावलं आहे. त्यानं चौकार मारून आपलं अर्धशतक पूर्ण केलं. मार्करामनं 34 चेंडूत 8 चौकारांसह 50 धावा पूर्ण केल्या.

  • 17 : 25 PM

दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 40 षटकांत 300 पार :

दक्षिण आफ्रिकेच्या संघानं शानदार फलंदाजी करत 41व्या षटकात 12 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेनं 3 गडी गमावून 300 धावा पूर्ण केल्या. सध्या दक्षिण आफ्रिकेकडून एडेन मार्कराम 52, हेनरिक क्लासेन 31 धावा करून खेळत आहेत.

  • 17 : 03

दक्षिण आफ्रिकेनं तिसरी विकेट गमावली :

दक्षिण आफ्रिकेनं रॅसी व्हॅन डेर ड्युसेनच्या रूपानं दुसरी विकेट गमावली आहे. रॅसी व्हॅन डर डुसेननं 108 धावा केल्या.

  • 16:36 PM

रॅसी व्हॅन डर डुसेनचं शतक पूर्ण :

दक्षिण आफ्रिकेकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रॅसी व्हॅन डर ड्युसेननं शानदार फलंदाजी करताना आपलं शतक पूर्ण केले. त्यानं डावाच्या 35व्या षटकात शतक पूर्ण करत 103 चेंडूत 12 चौकार 2 लगावले.

  • 16: 32 PM

दक्षिण आफ्रिकेची दुसरी विकेट पडली :

31व्या षटकातील चौथ्या चेंडूवर क्विंटन डी कॉक, मथिशा पाथिरानाचा बळी ठरला. डी कॉकनं 84 चेंडूत 100 धावांची खेळी केली. सध्या संघाची धावसंख्या 31 षटकांत 2 गडी गमावून 215 धावा आहे.

  • 15: 46 PM

क्विंटन डी कॉकचं अर्धशतक पूर्ण :

दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डी कॉकनं 2023 च्या विश्वचषकातील पहिल्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध अर्धशतक झळकावलं आहे. त्यानं 61 चेंडूत 4 चौकार, 1 षटकारासह 50 धावा पूर्ण केल्या.

  • 15: 14 PM

रॅसी व्हॅन डेर ड्युसेननं अर्धशतक झळकावलं :

दक्षिण आफ्रिकेकडून रॅसी व्हॅन डेर ड्युसेननेही अर्धशतक झळकावलं आहे. त्यानं 51 चेंडूत 6 चौकार, 1 षटकारासह आपलं अर्धशतक पूर्ण केलं.

  • 15: 14 PM

20 षटकात दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 118 पर्यंत पोहोचलीय. दक्षिण आफ्रिकेच्या संघानं 20 षटकात 1 गडी गमावून 118 धावा केल्या आहेत. क्विंटन डी कॉक 48, रॅसी व्हॅन डर डुसेन 60 धावांवर खेळत आहे.

  • 15: 11 PM

15 षटकात दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 84 पर्यंत पोहोचलीय. क्विंटन डी कॉक 33 धावा, रॅसी व्हॅन डर डुसेनच्या 42 धावांमुळं दक्षिण आफ्रिकेनं 15 षटकात 1 गडी गमावून 84 धावा केल्या आहेत.

  • 14:42 PM :

दक्षिण आफ्रिकेने 9 षटकांत षटकांत 1 गडी गमावून 50 धावा केल्या आहेत. सध्या क्विंटन डी कॉक 20 तर रॅसी व्हॅन डर ड्युसेन 17 धावांवर खेळत आहे.

  • 14:18 PM :

दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का : दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का 10 धावांवरच बसला. कर्णधार टेंबा बावुमा आठ धावा करून बाद झाला. त्याला मधुशंकानं एलबीडब्ल्यू केलंय. सध्या रॅसी व्हॅन डर डुसेन, क्विंटन डी कॉक क्रीजवर आहेत.

  • 2:05 PM:

दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका थेट धावसंख्या : दक्षिण आफ्रिकेचा डाव सुरू झाला आहे. कर्णधार टेंबा बावुमा, क्विंटन डी कॉक फलंदाजीसाठी आले आहेत. कसून रचितानं पहिल्या षटकात 5 धावा दिल्या आहेत. डी कॉकनं एक तर बावुमाने चौकार मारला.

  • 1:45 PM:

दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, लुंगी एनगिडी, कागिसो रबाडा

  • 1:40 PM :

श्रीलंका प्लेइंग इलेव्हन : कुसल परेरा, पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदिरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजय डी सिल्वा, दासुन शनाका (क), दुनिथ वेलालेज, मथिशा पाथिराना, दिलशान मधुशांका, दिलशान मधुशांका.

  • 1:30 PM :

श्रीलंकेनं नाणेफेक जिंकली :

दक्षिण आफ्रिका, श्रीलंका यांच्यात एकूण 80 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. या काळात दक्षिण आफ्रिकेनं 45 सामने जिंकले आहेत, तर एक सामना बरोबरीत सुटलाय. एका सामन्याचा निकाल लागला नाही.

श्रीलंकेचा संघ : पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदिरा समरविक्रमा, चरिथ असालंका, कुसल परेरा, धनंजय डी सिल्वा, दासुन शनाका (कर्णधार), कसून राजिथा, लाहिरू कुमारा, दुनिथ वेलालेज, दुनिथ वेलालेज, दुनिथ वेलालेज. मथिशा पाथीराना, महेश टीक्षाना

दक्षिण आफ्रिका संघ: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडेन मार्कराम, हेनरिक क्लासेन, अँडिले फेहलुकवायो, डेव्हिड मिलर, मार्को जॉन्सन, गेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, लुंगी एन. विल्यम्स, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी

Last Updated : Oct 7, 2023, 10:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.