दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ICC बुधवारी जाहीर केलेल्या ताज्या एकदिवसीय क्रमवारीत भारताचा सलामीवीर शुबमन गिलने 45 स्थानांनी झेप ICC ODI Rankings Shubman Gill jumps 45 places घेत 38वे स्थान पटकावले आहे. झिम्बाब्वेविरुद्ध नुकत्याच संपलेल्या एकदिवसीय मालिकेत 22 वर्षीय फलंदाजाने उत्कृष्ट कामगिरी केली होती. हरारे येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात त्याने वनडेतील पहिले शतक झळकावले.
दरम्यान, भारताचा माजी कर्णधार विराट कोहली 744 रेटिंग गुणांसह ICC ODI क्रमवारीत पाचव्या स्थानावर Virat Kohli remains static in fifth कायम आहे. झिम्बाब्वे दौऱ्यातून त्याला विश्रांती देण्यात आली होती. भारतीय कर्णधार रोहित शर्माही Indian captain Rohit Sharma सहाव्या स्थानावर कायम आहे. त्याला ही झिम्बाब्वे दौऱ्यात विश्रांती देण्यात आली होती. झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांत 154 धावा करुन सुद्धा अनुभवी सलामीवीर शिखर धवनची 12व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. पहिल्या आणि तिसऱ्या वनडेतही त्याने अर्धशतके झळकावली.
फलंदाजी क्रमवारीत बाबर आझम अव्वल स्थानावर कायम
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत एकूण 891 रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर Babar Azam tops ODI batting rankings आहे. त्याच्यापाठोपाठ दक्षिण आफ्रिकेचा रसी व्हॅन डर डुसेन Rasi van der Dusen आहे, ज्याचे 789 रेटिंग गुण आहेत. गोलंदाजांच्या यादीत न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट Fast bowler Trent Boult पहिल्या क्रमांकावर आहे, तर बांगलादेशचा शाकिब अल हसन अष्टपैलूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर कायम आहे.
हेही वाचा - Shubman Gill Statement शुबमन गिलच्या शतकामागे या सिक्सर किंगचा हात, स्वत; गिलने केला खुलासा