मेलबर्न : आयसीसी टी-20 विश्वचषकाचे 100 दिवसांचे काउंटडाउन ( ICC T20 World Cup countdown Start ) शुक्रवारपासून सुरू झाले आहे. आरोन फिंच, शेन वॉटसन, वकार युनिस आणि मॉर्नी मॉर्केल यांनी 'वर्ल्ड कप ट्रॉफी टूर' ( World Cup Trophy Tour ) लाँच केली. फिंचच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाने गेल्या वर्षी यूएईमध्ये आयसीसीची टी-20 ट्रॉफी जिंकली होती. या स्पर्धेत 16 देशांतील जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंचा समावेश असेल. ही स्पर्धा प्रथमच डाउन अंडरमध्ये आयोजित केली जात आहे.
फिंचने सांगितले की, त्याच्या संघाला विश्वचषक विजेतेपद राखण्यासाठी आता आणि मेगा-इव्हेंटची सुरुवात हा कालावधी महत्त्वाचा असेल. ऑस्ट्रेलियन कर्णधाराने म्हटले की, "क्रिकेटसाठी हा एक रोमांचक काळ आहे, अनेक जागतिक दर्जाचे संघ देशभरात खेळण्यासाठी येत आहेत." आता फक्त 100 दिवस शिल्लक असताना, घरच्या विश्वचषकात खेळण्याच्या शक्यतेबद्दल संघाच्या चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
-
𝐂𝐨𝐦𝐢𝐧𝐠 𝐬𝐨𝐨𝐧: The ICC Men's T20 World Cup Australia 2022 🏆
— ICC (@ICC) July 7, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
#T20WorldCup pic.twitter.com/9Jr8TX55oP
">𝐂𝐨𝐦𝐢𝐧𝐠 𝐬𝐨𝐨𝐧: The ICC Men's T20 World Cup Australia 2022 🏆
— ICC (@ICC) July 7, 2022
#T20WorldCup pic.twitter.com/9Jr8TX55oP𝐂𝐨𝐦𝐢𝐧𝐠 𝐬𝐨𝐨𝐧: The ICC Men's T20 World Cup Australia 2022 🏆
— ICC (@ICC) July 7, 2022
#T20WorldCup pic.twitter.com/9Jr8TX55oP
आयसीसी पुरुष विश्वचषक टूर ट्रॉफी चार खंडांमध्ये फिरेल आणि 16 ऑक्टोबर रोजी जिलॉन्गला परत येण्यापूर्वी स्पर्धा सुरू होईल. आयसीसीचे मुख्य कार्यकारी ज्योफ अल्लार्डिस ( ICC chief executive Geoff Allardyce ) यांनी सांगितले की, आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक 100 दिवसांवर आहे, ज्यामध्ये 16 संघ सहभागी होतील. या दौऱ्यात ट्रॉफी चार खंडांतील 13 देशांतील 35 ठिकाणांना भेट देणार आहे. फिजी, फिनलँड, जर्मनी, घाना, इंडोनेशिया, जपान, नामिबिया, नेपाळ, सिंगापूर आणि वानुआतू येथे प्रथमच टी-20 विश्वचषक स्पर्धेचे सामने खेळवले जाणार आहेत.