ETV Bharat / sports

Ricky Ponting : शेन वॉर्नबद्दल प्रत्येकवेळी विचार करतो, तेव्हा मी भावूक होतो - रिकी पाँटिंग - रिकी पाँटिंग न्यूज

शेन वॉर्नला भावूक होऊन श्रद्धांजली देताना पाँटिंग ( Ricky ponting on Shane warne ) म्हणाला की, तो अजून ही आपल्या जळच्या मित्राच्या निधनाच्या दुखातून सावरलेला नाही.

Ricky Ponting
Ricky Ponting
author img

By

Published : Mar 9, 2022, 9:40 AM IST

दुबई: ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगला ( Former captain Ricky Ponting ) शेन वॉर्न बाबात इतके प्रेम आहे की गेल्या काही दिवसांत तो दिवंगत स्पिनरचा आवाज ऐकून टीव्ही बंद करतो. कारण त्याला अजूनही विश्वास बसत नाही की त्याचा सहकारी आता नाही राहिला.

शेन वॉर्नला भावूक होत श्रद्धांजली वाहताना पाँटिंग म्हणाला की, त्याच्या जवळच्या मित्राच्या अनपेक्षित मृत्यूच्या दुःखातून तो अजूनही सावरलेला नाही.

रिकी पाँटिंग आयसीसी रिव्यू कार्यक्रमात ( ICC Review Program ) बोलताना म्हणाला, जेव्हा ही त्याच्या बद्दल बोलायचे असते किंवा आमचे शेअर केलेले प्रवासाचे अनुभव सांगायचे असतात, तेव्हा माझ्याकडे शब्दच नसतात. त्याचबरोबर आज ही जेव्हा मी टीव्हीवर श्रद्धांजली पाहतो आणि त्याचा आवाज ऐकतो, तेव्हा मी टीव्ही बंद करतो.

पाँटिंग म्हणाला, "गेले काही दिवस खडतर होते. पण कोणत्या गोष्टीकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. याबद्दल जागरूकता निर्माण झाली आहे. हा आपल्या सर्वांसाठी एक धडा आहे."

पाँटिंग आणि वॉर्न ( Ponting and Warne ) मेलबर्नमध्ये एकाच ठिकाणी राहत होते आणि अधूनमधून गोल्फ खेळत होते. पाँटिंग म्हणाला की, तो वॉर्नला एक गोष्ट कधीच सांगू शकला नाही. तो डोळे पुसताना म्हणाला, "मी त्याला सांगू शकलो नाही की, मी त्याच्यावर किती प्रेम करतो. मी सांगू शकलो असतो तर."

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.