ETV Bharat / sports

IPL 2022 Playoffs : सीएसकेला प्लेऑफसाठी पात्र ठरण्यासाठी 'असे' आहे समीकरण - आयपीएलच्या बातम्या

चेन्नई सुपर किंग्जला इंडियन प्रीमियर लीग 2022 च्या प्लेऑफमध्ये ( Indian Premier League 2022 playoffs ) पोहोचण्याची 3.4 टक्के शक्यता आहे. म्हणजेच संघ अंतिम चारमधून जवळपास बाहेर पडला आहे. दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्सच्या प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. गुजरात टायटन्स, लखनौ सुपर जायंट्स, राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अंतिम चारमध्ये पोहोचण्यासाठी सज्ज आहेत.

csk
csk
author img

By

Published : May 9, 2022, 6:58 PM IST

हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग 2022 ( Indian Premier League 2022 ) मध्ये आतापर्यंत 55 लीग सामने खेळले गेले आहेत आणि फक्त 15 सामने बाकी आहेत. पण कोणते चार संघ प्लेऑफसाठी पात्र ठरू शकतात हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स मात्र प्लेऑफसाठी पात्र ठरण्याच्या शर्यतीतून बाहेर पडला ( MI out of the playoffs race ) आहे. त्यानंतर आता सीएसके संघासाठी प्लेऑफसाठी पात्र ठरण्यासाठी काय समीकरण आहे, ते जाणून घेऊयात.

आयपीएल 2022 ( IPL 2022 ) मध्ये मुंबई इंडियन्स (MI) वगळता, प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी नऊ संघांमध्ये अजूनही लढत आहे. केवळ गणिती आकडेवारीनुसार ते शक्य झाले असले तरी मुंबई वगळता प्रत्येक संघ प्लेऑफच्या शर्यतीत आहे. इतकंच नाही तर मुंबई इंडियन्स टॉप 4 मध्ये स्थान मिळवू शकत नाही, पण पाचव्या क्रमांकावर नक्कीच स्थान मिळवू शकते. मुंबईने यापूर्वी आठ सामने गमावले होते आणि आता दोन सामने जिंकले आहेत.

दुसरीकडे, जर आपण एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज ( Chennai Super Kings ) बद्दल बोलायचे, तर संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता अजूनही कायम आहे. दिल्लीविरुद्धचा सामना दमदार पद्धतीने जिंकणाऱ्या सीएसकेला अजूनही प्लेऑफमध्ये पोहोचण्याची 3.4 टक्के शक्यता आहे. सीएसके टॉप-4 किंवा टॉप-3 मध्ये स्थान मिळवू शकते, पण त्याची शक्यता फारच कमी आहे. मात्र, यासाठी चेन्नईला उर्वरित तीन सामने कोणत्याही किंमतीत जिंकावे लागतील.

सीएसकेने 11 पैकी चार सामने जिंकले आहेत आणि आयपीएल 2022 च्या गुणतालिकेत आठ गुणांसह संघ आठव्या स्थानावर पोहोचला आहे. अशा परिस्थितीत सीएसकेने उर्वरित तीन सामने जिंकल्यास चेन्नईच्या खात्यात 14 गुण होतील. अशा प्रकारे संघाला प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. चेन्नईला 14 गुण मिळाले तर आणखी तीन संघही त्याच गुणांवर पूर्ण करतील, परंतु नंतर नेट रनरेटचा मुद्दा कोण प्लेऑफमध्ये पोहोचेल आणि कोण नाही हे ठरवेल.

सध्या आयपीएल 2022 च्या प्लेऑफमध्ये लखनौ सुपर जायंट्स ( Lucknow Super Giants ) आणि गुजरात टायटन्सचे ( Gujarat Titans ) स्थान निश्चित दिसत आहे. कारण दोन्ही संघांचे 16-16 गुण झाले आहेत. त्याचवेळी राजस्थान रॉयल्सच्या ( Rajasthan Royals ) खात्यात 14 गुण जमा आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या खात्यातही तेवढेच गुण आहेत. अशा स्थितीत उर्वरित संघांना प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता कमी आहे. चेन्नई आणि कोलकाता संघांनी येथे कोणत्याही एका संघाने सामना गमावला तर त्यांचा प्रवास संपुष्टात येईल.

हेही वाचा - IPL 2022 Updates : दिल्ली विरुद्धच्या सामन्यानंतर धोनीची मोठे वक्तव्य, म्हणाला 'हा' जगाचा अंत नाही

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.