ETV Bharat / sports

IPL 2022 Updates : चहल एका मोसमात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम मोडू शकतो - ग्रॅम स्मिथ - टाटा आयपीएल 2022

आयपीएल ( IPL 2022 ) चा 15 वा सीझन सुरु आहे. जसजसे आयपीएलचे सामने खेळले जात आहेत, तसतसे क्रिकेट चाहत्यांमध्ये खेळाडूंच्या कामगिरीबद्दल जाणून घेण्याची इच्छा वाढत आहे. अशा परिस्थितीत दक्षिण आफ्रिकेच्या माजी कर्णधाराने राजस्थान रॉयल्सचा खेळाडू युझवेंद्र चहलबाबत महत्वाचे वक्तव्य केले आहे. चहल सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम मोडू शकतो, असा विश्वास माजी कर्णधाराने व्यक्त केला.

Yuzvendra Chahal
Yuzvendra Chahal
author img

By

Published : Apr 22, 2022, 6:35 PM IST

मुंबई: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 34 वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ( Rajasthan Royals vs Delhi Capitals ) संघात खेळला जाणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर शुक्रवारी संध्याकाळी साडेसातला सुरु होईल. या अगोदर युझवेंद्र चहलबद्दल दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅम स्मिथने महत्वाचे वक्तव्य केले आहे.

  • "I knew in my mind that I have to take wickets in this over (hat-trick over) and that's the only way the game would change." - Yuzvendra Chahal pic.twitter.com/LY0Lp65ehd

    — Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 18, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅम स्मिथला ( Former captain Grammy Smith ) वाटते की राजस्थान रॉयल्सचा लेग-स्पिनर युझवेंद्र चहलकडे ( Leg-spinner Yuzvendra Chahal ) 2013 मध्ये ड्वेन ब्राव्हचा आणि 2021 मध्ये हर्षल पटेल यांनी आयपीएलच्या एका हंगामात 32 विकेट्स घेऊन सर्वाधिक आयपीएल विकेट्सचा विक्रम मोडण्याची सर्व क्षमता आहे. चहलने हॅट्ट्रिकसह 5/40 विकेट घेत आणि कोलकाता नाईट रायडर्सवर राजस्थान रॉयल्सला सात धावांनी विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली. चहल सध्या आयपीएल 2022 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्याने 10.35 च्या सरासरीने 17 विकेट्स घेतल्या आहेत.

क्रिकेट डॉट कॉमला बोलताना स्मिथने म्हटले आहे की, चहलने अविश्वसनीय गोलंदाजी केली आहे. स्पर्धा जसजशी पुढे सरकत जाईल तसतसे त्याच्याकडून आणखी विकेट्स घेण्याची अपेक्षा आहे. त्याने आपला वेग चांगला वापरला आहे. मी त्याला चेंडू स्विंग करताना पाहिले आहे. रॉयल्सला पुढे नेण्याची त्याच्यात पूर्ण क्षमता आहे. एका मोसमात सर्वाधिक विकेट घेण्याचा ब्राव्होचा विक्रमही ( Bravo's record for most wickets) तो मोडू शकतो.

दिल्लीचा डावखुरा वेगवान गोलंदाज खलील अहमद ( Bowler Khalil Ahmed ) कर्णधार ऋषभ पंतसाठी मौल्यवान गोलंदाज ठरू शकतो, असे स्मिथला वाटते. पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्याच्या काही तास आधी टीम सेफर्टला कोरोना झाल्यानंतर ही दिल्लीने पंजाब किंग्जला नऊ विकेट्सनी पराभूत करण्यासाठी अष्टपैलू कामगिरी केली. जिथे खलीलने 2/21 विकेट्स घेतले. खलील 14.30 च्या सरासरीने 10 विकेट्स घेऊन आयपीएलच्या पंधराव्या हंगामात( IPL 2022 ) सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत सातव्या स्थानावर आहे.

हेही वाचा - Ravindra Jadeja Statement : धोनीवर पूर्ण विश्वास होता, तो संघाला विजय मिळवून देणारच रवींद्र जडेजा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.