हैदराबाद - ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल लग्नबंधनात अडकला ( Glenn Maxwell Marries Vini Raman ) आहे. भारतीय वंशाच्या विनी रमण या आपल्या मैत्रिणीसोबत 18 मार्चला लग्नगाठ बांधली आहे. दोघांनी सोशल मिडियावर फोटो शेअर केले आहेत. त्याला 'मिस्टर आणि मिसेस मॅक्सवेल' असे कॅप्शन दिले आहे.
2017 पासून ग्लेन मॅक्सवेल आणि विनी रमण एकत्र आहेत. 14 मार्च 2020 साली दोघांनी साखरपुडा केला होता. त्यानंतर त्यांच्या लग्नाची चर्चा सुरु होती. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने, कोरोना आणि लॉकडाऊन मुळे विवाह रखडला होता. लग्नगाठ बांधल्यानंतर रॉयल चॅलेंजस बंगळुरुने दोघा जोडप्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
मेलबर्न मध्ये केला प्रपोज
-
The RCB family is incredibly happy for @vini_raman and @Gmaxi_32 on the beginning of this new chapter in their lives. 🥳🤩
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) March 19, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Wishing you both all the happiness and peace, Maxi! ❤️🙌🏻 pic.twitter.com/RxUimi3MeX
">The RCB family is incredibly happy for @vini_raman and @Gmaxi_32 on the beginning of this new chapter in their lives. 🥳🤩
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) March 19, 2022
Wishing you both all the happiness and peace, Maxi! ❤️🙌🏻 pic.twitter.com/RxUimi3MeXThe RCB family is incredibly happy for @vini_raman and @Gmaxi_32 on the beginning of this new chapter in their lives. 🥳🤩
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) March 19, 2022
Wishing you both all the happiness and peace, Maxi! ❤️🙌🏻 pic.twitter.com/RxUimi3MeX
मॅक्सवेल ने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत आपल्या नात्याबद्दल सांगितले होते. मेलबर्न मधील एका बागेत विनीला प्रपोज केले होते, असे मॅक्सवेल म्हणाला होता. 2019 मध्ये ऑस्ट्रेलिया क्रिकेटच्या एका समारंभात मॅक्सवेल एकत्र दिसले होते. त्यानंतर 2020 मध्ये भारतीय परंपरेनुसार दोघांनी साखरपुडा केला होता. त्यामध्ये ग्लेन आणि विनीचे मित्र-मैत्रीणी आणि परिवार सामील झाला होता.
कोण आहे विनी रामन?
भारतीय वंशाची विनी रामन हीचा जन्म 3 मार्च 1993 साली ऑस्ट्रेलियात झाला आहे. मूळची दक्षिण भारतीय असलेले विनीचे आई-बाबा कामानिमित्त ऑस्ट्रेलियात गेले होते. तेथेच स्थायिक झाले.
हेही वाचा - ICC Womens World Cup 2022 : ऑस्ट्रेलियाची सेमिफायलमध्ये धडक; भारतावर 6 विकेट्सने मात