हैदराबाद: हैदराबाद: ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने ( Australian all-rounder Glenn Maxwell ) 18 मार्च रोजी आपली भारतीय वंशाची गर्लफ्रेंड विनी रमनसोबत लग्न केले होते. पण दोघेही ख्रिश्चन रितीरिवाजांनी एकमेकांचे झाले होते. आता मॅक्सवेलच्या लग्नाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने तमिळ रितीरिवाजानुसार लग्न केले आहे.
-
Vanakam da Mapla @Gmaxi_32 😁💛#WhistlePodu | #IPL2022 pic.twitter.com/wRVdrUrGv6
— CSK Fans Army™ 🦁 (@CSKFansArmy) March 28, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Vanakam da Mapla @Gmaxi_32 😁💛#WhistlePodu | #IPL2022 pic.twitter.com/wRVdrUrGv6
— CSK Fans Army™ 🦁 (@CSKFansArmy) March 28, 2022Vanakam da Mapla @Gmaxi_32 😁💛#WhistlePodu | #IPL2022 pic.twitter.com/wRVdrUrGv6
— CSK Fans Army™ 🦁 (@CSKFansArmy) March 28, 2022
या व्हिडिओमध्ये मॅक्सवेल खूप आनंदी दिसत आहे. त्याने पारंपारिक भारतीय नवरदेवाप्रमाणे शेरवानी घातली आहे. तसेच त्याच्या हातात लग्नाची माळा आहे आणि तो त्याच्यासोबत नाचताना दिसत आहे. त्याचवेळी विनीही मॅक्सवेलच्या या स्टाइलचे कौतुक ( Maxwell's appreciation from Vini ) करताना दिसत आहे.
मॅक्सवेल आणि विनी दोघेही बराच काळ एकत्र होते. या दोघांनी २०२० मध्ये एंगेजमेंट केली होती. पण कोरोनामुळे त्यांचे लग्न पुढे ढकलले गेले होते. त्यामुळे आता दोन वर्षांनी दोघांनी सात जन्माची गाठ बांधली आहे.
विनी रमनच्या इन्स्टाग्राम पोस्टवरून विनी आणि मॅक्सवेलच्या लग्नाचा खुलासा ( Vini and Maxwell's wedding revealed ) झाला होता. लग्नानंतरचा तिचा आणि मॅक्सवेलचा पहिला फोटो शेअर करताना तिने लिहिले की, 'मिस्टर आणि मिसेस मॅक्सवेल.'
भारतीय वंशाची विनी तामिळ कुटुंबातील आहे. तिचा जन्म आणि शिक्षण ऑस्ट्रेलियातच झाले. विनीचे वडील व्यंकट रमण आणि आई विजयालक्ष्मी विनीच्या जन्माआधीच ऑस्ट्रेलियाला गेले होते.
लग्नानंतर आरसीबीशी जोडला गेला मॅक्सवेल - आरसीबीने त्यांच्या सोशल मीडियाद्वारे मॅक्सवेलच्या फ्रँचायझीशी जोडला गेल्याची माहिती दिली आहे. मॅक्सवेल नियमित क्वारंटाईन पूर्ण केल्यानंतरच सराव सुरू करू शकेल. फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील संघाचा पुढील सामना 5 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणार आहे.
-
To answer all the million comments and tweets asking us “When is Maxwell arriving?” 😎
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) April 1, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Extremely excited to have you here, @Gmaxi_32! Let the show begin! 🤩#PlayBold #WeAreChallengers #IPL2022 #Mission2022 #RCB #ನಮ್ಮRCB pic.twitter.com/wB41EOJNP9
">To answer all the million comments and tweets asking us “When is Maxwell arriving?” 😎
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) April 1, 2022
Extremely excited to have you here, @Gmaxi_32! Let the show begin! 🤩#PlayBold #WeAreChallengers #IPL2022 #Mission2022 #RCB #ನಮ್ಮRCB pic.twitter.com/wB41EOJNP9To answer all the million comments and tweets asking us “When is Maxwell arriving?” 😎
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) April 1, 2022
Extremely excited to have you here, @Gmaxi_32! Let the show begin! 🤩#PlayBold #WeAreChallengers #IPL2022 #Mission2022 #RCB #ನಮ್ಮRCB pic.twitter.com/wB41EOJNP9
मात्र तो या सामन्याच्या संघ निवडीसाठी उपलब्ध असणार नाही. 6 एप्रिलपासून सर्व ऑस्ट्रेलियन खेळाडू आयपीएल खेळण्यासाठी उपलब्ध असतील, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आधीच जाहीर केले आहे.
मॅक्सवेलने आयपीएलच्या चौदाव्या हंगामामध्ये 15 सामन्यांमध्ये 42.75 च्या सरासरीने 513 धावा केल्या होत्या. त्याचा स्ट्राइक रेट 144 पेक्षा जास्त होता. आता आरसीबीसोबत एबी डिव्हिलियर्स नाही. त्या निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत मॅक्सवेलने लवकरात लवकर संघात यावे, अशी क्रिकेट चाहत्यांची इच्छा असेल.