कॅनबेरा - न्यूझीलंडचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू ख्रिस केर्न्स यांना सिडनीमध्ये हृदया विकाराच्या शस्त्रक्रियेदरम्यान पक्षघाताचा झटका आला आहे. त्यांच्यावर सिडनी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे त्याची तब्येत गंभीर असल्याचे सांगण्यात येते.
ख्रिस केन्सला छातीत दुखू लागल्याने कॅनबरा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्याच्यावर काही पार पडल्या होत्या. त्यानंतर केन्सला सिडनी येथील एका विशेष रुग्णालयात ट्रान्सफर करण्यात आले होते.
एका मीडिया आउटलेटनुसार, केर्न्स कॅनबेराला परतले असले तरी त्यांची प्रकृती गंभीर आहे.
"हृदयाच्या शस्त्रक्रियेदरम्यान ख्रिसला सिडनीमध्ये त्याच्या मणक्याला झटका आला. यामुळे त्याच्या पायांना अर्धांगवायू झाला आहे," केर्न्सचे वकील आरोन लॉयड यांनी एका निवेदनात असे म्हटले आहे.
पुढील उपचारासाठी त्याला ऑस्ट्रेलियातील स्पायनल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ख्रिस आणि त्याचे कुटुंब या कठीण काळात पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे कौतुक करीत आहे.
ख्रिसच्या कुटुंबाला तो या आजारातून लवकर बरा होईल याची प्रतीक्षा आहे. तो यातून कसा रिकव्हर होईल यावर त्यांनी आपले लक्ष्य केंद्रित केले आहे. त्याच्या तब्येतीत सुधारणा होतील तसे त्याचे अपडेट चाहत्यांना देणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
ख्रिस केर्न्सने 1989 ते 2006 दरम्यान न्यूझीलंडसाठी 62 कसोटी, 215 एकदिवसीय आणि दोन टी -20 सामने खेळले. अनुभवी अष्टपैलू ख्रिसने 33 पेक्षा जास्त सरासरीने 3,320 कसोटी धावा केल्या आणि फक्त 29 च्या सरासरीने 218 विकेट्स घेतल्या आहेत.
एकदिवसीय सामन्यांमध्ये केर्न्सने 29.46 च्या सरासरीने 4,950 धावा जमवल्या आणि 32.80 च्या सरासरीने 201 विकेट घेतल्या. केर्न्स याला 2000 मध्ये वर्षातील पाच विस्डेन क्रिकेटपटूंपैकी एक म्हणून नाव देण्यात आले होते आणि न्यूझीलंडचे माजी अष्टपैलू लान्स केर्न्स यांचा तो मुलगा आहे.
हेही वाचा - सोनू सूदने घेतली अरविंद केजरीवालांची भेट, तर्क वितर्कांना वेग