काबूल: अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (एसीबी) माजी अध्यक्षाला सुरक्षा दलांनी अटक केली आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये याबाबतची माहिती देण्यात आली आहे. अझिझुल्ला फाजली याने जेव्हा सोमवारी एसीबीच्या आवारात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आणि बोर्डाचे प्रमुखपद बळजबरीने ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याला अटक ( Former Afghanistan cricket board chief arrested ) करण्यात आली.
वीओएने काबूल पोलिस मुख्यालयातील ( VOA at Kabul Police Headquarters ) एका अज्ञात स्त्रोताचा हवाला देऊन सांगितले की, एसीबी सुरक्षा रक्षकांनी फाजलीला आत जाण्यापासून रोखले. पाझवोक न्यूजच्या वृत्तानुसार, माजी अध्यक्षांकडे इस्लामिक अमिरातीच्या नेत्याच्या वतीने क्रिकेट बोर्डाला उद्देशून बनावट नियुक्ती पत्र असल्याचा आरोप आहे. वृत्तानुसार, पंतप्रधानांच्या आदेशाचे पालन करत फाजलीला अटक करण्यात आली.
त्याला आत जाण्यापासून रोखण्यासाठी एसीबीच्या रक्षकांनी हवेत गोळीबार केला. काही वेळातच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामध्ये फाजलीला ( Former ACB president Azizullah Fazli ) एसीबीच्या आवारात जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. सरकारी अधिकार्यांनी या घटनेवर औपचारिकपणे भाष्य केलेले नाही, परंतु पोलीस आणि एसीबीच्या सूत्रांनी फाजलीच्या अटकेला दुजोरा दिला आहे.
हेही वाचा - Womens Hockey World Cup 2022 : भारत आणि चीनमधील सामना अनिर्णीत, भारताला पहिल्या विजयाची प्रतिक्षा