मुंबई - माजी क्रिकेटर लालचंद राजपूत यांनी 'ईटीव्ही भारत'शी बातचित केली. यात त्यांनी सांगितलं की, क्रिकेट अफगाणिस्तानींना एकमेकांसोबत जोडतं. मला आशा आहे की, अफगाण क्रिकेटचा विकास चालू राहिलं. दरम्यान, राजपूत यांनी 2016 ते 2017 या काळात अफगाणिस्तान क्रिकेट संघाला प्रशिक्षण दिलं आहे.
लालचंद म्हणाले की, अफगाणिस्तानसाठी क्रिकेट नवीन आहे. 19व्या शतकाच्या सुरूवातीला इंग्रजांनी क्रिकेट खेळायला सुरूवात केली. पण अफगाणिस्तानला भारत आणि पाकिस्तान सारखं क्रिकेट क्षेत्रात जास्त पाय रोवता आलेले नाहीत. 1980 च्या दशकात सेवियत संघविरुद्धच्या युद्धात पळालेल्या अफगाणिस्तांनीनी पाकिस्तानमध्ये शरण घेतले. तिथे त्यांनी क्रिकेट खेळायला सुरूवात केली. राशिद खान टी-20 क्रिकेटमध्ये सर्वश्रेष्ठमधील एक खेळाडू आहे. नबी पाकिस्तानमध्ये क्रिकेट शिकला. पण क्रिकेट जाणकारांचे म्हणणे आहे की, अफगाणिस्तानमध्ये क्रिकेट तालिबानच्या शासनात आला.
अफगाणिस्तान क्रिकेट संघ ज्याला आता अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने ओळखले जाते, याची स्थापना 1994 साली झाली. तालिबानींनी फुटबॉल आणि अॅथलिटवर बंदी घातली. तेव्हा क्रिकेट कसाबसा यातून वाचला. अनेक जण पाकिस्तानमध्ये क्रिकेट शिकले.
लालचंद राजपूत पुढे म्हणाले की, मला अफगाणिस्तान खेळाडूंची एक गोष्ट आवडते ती म्हणजे, क्रिकेटच्या प्रती त्यांचं प्रेम. ते कधी कठोर कष्ठ करण्यास मागे हटत नाहीत. नेहमी ते अधिक प्रयत्न करण्यास उत्सुक असतात. उदाहरण द्यायचे झाले तर मी त्यांना म्हणालो की, तुम्हाला 20 मिनिटे धावायचे आहे. यावर त्यांचं उत्तर आलं की, 40 मिनिटे का नाही. अफगाणिस्तानकडे कधी स्वत:चे मैदान नव्हतं. आणि एका आंतरराष्ट्रीय संघासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा देखील नव्हत्या. तेव्हा बीसीसीआयने त्यांना नोएडामध्ये एक मैदान दिलं. ज्यावर त्यांनी कठोर मेहमत घेतली.
दरम्यान, अफगाणिस्तानचा संघ सद्या टी-20 क्रमवारीत 7व्या स्थानावर आहे. ते श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि बांगलादेशच्या वरच्या क्रमांकावर आहेत. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये ते 10व्या स्थानी आहेत. अफगाणिस्तानला जवळून पाहिलेले आणि प्रशिक्षक राहिलेले लालचंद राजपूत अखेरीस म्हणाले की, मला आशा की, अफगाणिस्तान क्रिकेटचा विकास सुरू राहिल.
हेही वाचा - क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी केलं शैली सिंहच्या कामगिरीचे कौतुक
हेही वाचा - IND VS ENG : भारतीय संघात अजूनही दोष आहेत - नासिर हुसेन