चेन्नई - इंग्लंडचा कर्णधार जो रूट आपला १००वा कसोटी सामना खेळण्यासाठी चेन्नईच्या चेपॉक मैदानावर उतरला आहे. अशी कामगिरी नोंदवणारा तो तिसरा युवा क्रिकेटपटू ठरला. १०० कसोटी खेळणारा रूट हा १५वा क्रिकेटपटू आहे.
चेन्नई कसोटीच्या पहिल्या दिवशी रूटचे वय ३० वर्षे ३७ दिवस आहे. कसोटी इतिहासातील सर्वात युवा क्रिकेटपटू म्हणून १००वा कसोटी सामना खेळण्याचा विक्रम इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कुकच्या नावावर आहे.
-
1⃣0⃣0⃣*
— ICC (@ICC) February 5, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Congratulations to England skipper @root66, who is making his 100th Test appearance in the first #INDvENG match in Chennai.
Massive achievement 👏 pic.twitter.com/elzHvWp1Iw
">1⃣0⃣0⃣*
— ICC (@ICC) February 5, 2021
Congratulations to England skipper @root66, who is making his 100th Test appearance in the first #INDvENG match in Chennai.
Massive achievement 👏 pic.twitter.com/elzHvWp1Iw1⃣0⃣0⃣*
— ICC (@ICC) February 5, 2021
Congratulations to England skipper @root66, who is making his 100th Test appearance in the first #INDvENG match in Chennai.
Massive achievement 👏 pic.twitter.com/elzHvWp1Iw
हेही वाचा - बुमराहचे भारतात कसोटी पर्दापण, श्रीनाथला टाकले मागे
२०१३ मध्ये कुकने आपले वय २८ वर्ष ३५३ दिवस असताना आपला १००वा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा क्रमांक लागतो. सचिनने २००२ मध्ये वयाच्या २९ वर्ष आणि १३४व्या दिवशी आपला १००वा कसोटी सामना खेळला होता. कुकने इंग्लंडसाठी सर्वाधिक १६१ कसोटी सामने खेळले आहेत.
सचिनने २०१३मध्ये आपल्या कारकीर्दीची २००वी कसोटीही खेळली होती. हा टप्पा गाठणारा तो एकमेव कसोटी क्रिकेटपटू आहे. त्याचवर्षी सचिन निवृत्त झाला.