लीड्स - भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना हेडिंग्ले, लीड्स येथे खेळला जात आहे. कसोटीच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडने भारताविरोधात 432 धावा केल्या आहेत. इंग्लंडने 354 धावांची मजबूत आघाडी केली आहे.
भारताने पहिल्या डावात केवळ 78 धावा केल्या होत्या. मात्र, इंग्लंडचा कॅफ्टन जोए रुटने 165 चेंडुत 14 चौकारांसह 121 धावा काढल्या आहेत. त्यामुळे इंग्लंडला 432 धावांचा डोंगर उभा करता आला. इंग्लंडने आज 423 धावानंतर खेळण्यास सुरुवात केली. क्रेग ओवरटोनने 24 आणि ओली रॉबिन्सनने धावा काढून डावाला सुरुवात केली.
हेही वाचा- Ind Vs Eng 3rd Test : इंग्लंडची सलामीवीर जोडी माघारी, लंचपर्यंत 104 धावांची आघाडी
भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडचे उर्वरित दोन गडी बाद करून पहिला डाव लवकर आटोपला. इंग्लंडच्या डावात डेविड मलानने 70, हसीब हमीदने 68, रोरी बर्न्सने 61, जॉनी बेयरस्टोने 29 , ओवरटोनने 32, सॅम करेनने 15, मोइन अलीने 8, जोस बटलने 7 धावा काढल्या आहेत. रॉबिन्सनला धावांचा भोपळाही फोडता आला नाही.
हेही वाचा- IND vs ENG: 39 वर्षीय जेम्स अँडरसन 'अशी' राखून ठेवतो आपली ऊर्जा
तर जेम्स एंडरसनही शून्यावर नाबाद राहून पॅव्हिलियनवर परतला. भारताचे गोलंदाज मोहम्मद शमीने चार गडी बाद केले. तर मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
हेही वाचा- IPL 2021: KKR मध्ये खेळणार टिम साउथी, पॅट कमिन्सची माघार
पहिल्या डावात इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारताच्या डावाला पाडले होते खिंडार
लॉर्ड्स कसोटीत दमदार विजय मिळवल्यानंतर हेडिंग्ले मैदानावर भारतीय संघ मोठ्या आत्मविश्वासाने मैदानात उतरला खरा. पण इंग्लंड गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय धुरंदरांनी अक्षरशः लोटांगण घातले होते. इंग्लंडच्या माऱ्यासमोर भारताचा पहिला डाव अवघ्या 78 धावांत आटोपला होता. रोहित शर्मा (19) आणि अजिंक्य रहाणे (18) या दोघांना वगळता अन्य फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. जेम्स अँडरसन, ओली रॉबिन्सन, क्रेग ओवरटन आणि सॅम कुरेन या गोलंदाजांनी भारताच्या डावाला खिंडार पाडले होते.