लीड्स - इंग्लंड दौऱ्यावर असलेला भारतीय क्रिकेट संघ तिसऱ्या कसोटी सामन्यात अडचणीत आला आहे. भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि त्यानंतर अवघ्या 21 धावांत भारताचे अव्वल 3 फलंदाज माघारी परतले. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याने कर्णधार विराट कोहलीची विकेट घेतली. विशेष म्हणजे तीनही विकेट अँडरसन यानेच घेतले.
विराट कोहलीच्या करियरमधील आजचा 95वा कसोटी सामना आहे. तो कसोटी करियरमध्ये 149व्यांदा बाद झाला. यात जेम्स अँडरसन याने विराटला सर्वाधिक वेळा बाद केले. अँडरसनने विराटला 7 वेळा तंबूत धाडलं आहे. अँडरसन शिवाय ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लिओन याने देखील विराट कोहलीला सर्वाधिक 7 वेळा बाद केले आहे.
-
We think @jimmy9 enjoyed this one! 💥
— England Cricket (@englandcricket) August 25, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Scorecard/Videos: https://t.co/UakxjzUrcE
🏴 #ENGvIND 🇮🇳 pic.twitter.com/3zGBCmJlhQ
">We think @jimmy9 enjoyed this one! 💥
— England Cricket (@englandcricket) August 25, 2021
Scorecard/Videos: https://t.co/UakxjzUrcE
🏴 #ENGvIND 🇮🇳 pic.twitter.com/3zGBCmJlhQWe think @jimmy9 enjoyed this one! 💥
— England Cricket (@englandcricket) August 25, 2021
Scorecard/Videos: https://t.co/UakxjzUrcE
🏴 #ENGvIND 🇮🇳 pic.twitter.com/3zGBCmJlhQ
जेम्स अँडरसन याने विराटला 7 पैकी 6 वेळा इंग्लंडमध्ये खेळताना बाद केले आहे. यात विराट सहाही वेळा झेलबाद झाला आहे. स्टुअर्ट ब्राँड, मोईन अली आणि बेन स्टोक्स यांनी विराटला प्रत्येकी 5-5 वेळा बाद करण्याचा कारनामा केला आहे. याशिवाय पॅट कमिन्सने देखील पाच वेळा विराटला बाद केले आहे.
विराट कोहली विरुद्ध जेम्स अँडरसन हा सामना 2012 मध्ये सुरू झाला. यावेळी जेम्स अँडरसन याने विराट कोहलीला कोलकाता कसोटी सामन्यात बाद केले होते. त्यानंतर 2014 इंग्लंड दौऱ्यात अँडरसन याने विराटला 4 वेळा बाद केले. भारतीय संघ यानंतर 2018 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. पण या दौऱ्यात जेम्स अँडरसनला विराट कोहलीला एकदाही बाद करण्यात यश आलं नव्हतं. इतकेच नव्हे तर 2021 भारत दौऱ्यात देखील अँडरसनला विराटची विकेट घेतला आली नाही.
भारतीय संघ पाच कसोटी सामन्याची मालिका खेळण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर आहे. या मालिकेत जेम्स अँडरसन याने विराटला आतापर्यंत 2 वेळा बाद केले आहे. आता उर्वरित मालिकेत देखील अँडरसन विराट कोहलीसाठी कर्दनकाळ ठरणार की विराट अँडरसनला झोडपणार हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
हेही वाचा - भारतीय महिला संघासाठी वाईट बातमी; ऑस्ट्रेलिया दौऱ्यात होऊ शकतो बदल, जाणून घ्या कारण
हेही वाचा - विराट कोहलीचा मैदानाबाहेर स्वभाव कसा आहे?, न्यूझीलंडच्या गोलंदाजानं सांगितलं