लाहोर - रमीज राजा यांना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष करण्यात येऊ नये, अशी मागणी पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज सर्फराज नवाज यांनी केली आहे. रमीज राजा भारताच्या समर्थनात आणि पाकिस्तानच्या विरोधात बोलतात, असे नवाज यांचे म्हणणे आहे.
पाकिस्तानचे माध्यम डॉनच्या रिपोर्ट नुसार, सर्फराज नवाज यांनी पंतप्रधान इम्रान खान यांना पत्र लिहलं आहे. यात त्यांनी पीसीबीचे चेअरमन जहीर अब्बास किंवा माजिद खान यांना पीसीसीचे अध्यक्ष करण्याचा सल्ला दिला आहे.
सर्फराज नवाज यांनी त्यांच्या पत्रात लिहलं आहे की, माध्यमात बातमी आहे की, तुमच्या संमतीने पीसीबीच्या अध्यक्ष पदासाठी एहसान मनीच्या जागेवर रमीज राजा यांना नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पीसीबीचे कर्तेधर्ते म्हणून तुम्हाला हा अधिकार आहे. यात कोणतीही शंका नाही. तुम्ही कोणालाही पीसीबीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करू शकता.
पीसीबीचे अध्यक्ष म्हणून निवडीचा निर्णय घेताना त्या व्यक्तीबद्दल संपूर्ण माहिती असावी. रमीज राजा हे भारताच्या बाजूने बोलतात. तसेच त्यांनी नुकतेच पाकिस्तान विरुद्ध अपमानजक प्रतिक्रिया दिली होती. त्यांची ही मानसिकता असल्याचे देखील सर्फराज नवाज यांनी म्हटलं आहे.
तुम्ही या निर्णयासाठी योग्य व्यक्ती आहात. मी तुम्हाला विनम्र सल्ला देतो की, दिग्गज माजिद खान ज्यांचे आयसीसी बोर्डातील सर्व सदस्यांसोबत चांगले संबंध आहेत. त्यांची किंवा जहीर अब्बास जे माजी आयसीसी अध्यक्ष आहेत, त्यांची पीसीबी अध्यक्ष म्हणून निवड करावी, अशी मागणी सर्फराज यांनी त्यांच्या पत्रात इम्रान खानकडे केली आहे.
हेही वाचा - WI vs PAK 2nd Test: किंग्स्टन कसोटीवर पाकिस्तानची मजबूत पकड, विंडीजवर पराभवाचे ढग
हेही वाचा - IND vs ENG: जसप्रीत बुमराहवर जेम्स अँडरसनचा गंभीर आरोप, म्हणाला...