ETV Bharat / sports

IPL 2022 Updates : दिल्ली कॅपिटल्सच्या अडचणीत पुन्हा वाढ; 'या' गोलंदाजाला झाली कोरोनाची लागण - दिल्ली कॅपिटल्स

आयपीएल 2022 ( IPL 2022 ) च्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यापूर्वी, दिल्ली कॅपिटल्सच्या नेट गोलंदाजाची कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. नेट गोलंदाजाला अन्य गोलंदाजासह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

Delhi Capitals
Delhi Capitals
author img

By

Published : May 8, 2022, 5:33 PM IST

मुंबई: आयपीएल 2022 च्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. मागील काही दिवसापूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघात अनेक कोविड-19 ची पॉझिटिव्ह प्रकरणे आढळली होती. ज्यानंतर ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स या सर्व अडचणींतून सावरल्यानंतर नुकतेच पुनरागमन करणार होते की, त्यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाच्या एका नेट गोलंदाजाला कोरोनाची लागण ( Delhi Capitals net bowler Corona infects ) झाली आहे.

स्पोर्टक्रीडाच्या वृत्तानुसार, चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यापूर्वी, दिल्ली कॅपिटल्सच्या नेट गोलंदाजाची कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. नेट गोलंदाजाला अन्य गोलंदाजासह अलग ठेवण्यात आले आहे. बीसीसीआयच्या कोविड-19 प्रोटोकॉलनुसार ( BCCI Covid-19 protocol ), रविवारी संध्याकाळी सामन्यापूर्वी संपूर्ण दिल्ली संघाला दुसऱ्या फेरीतून जावे लागेल. नेट गोलंदाज कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. त्याच्या संपर्कातील इतर खेळाडूंना खोलीतच राहण्याची सूचना दिली गेली आहे. तसेच भारतीय बोर्डाच्या कोविड नियमांनुसार, दिल्ली संघातील सर्व खेळाडूंची अजून एकदा कोविड चाचणी केली जाईल. तोपर्यंत सर्व खेळाडू त्यांच्या खोलीत आयसोलेशनमध्ये राहतील.

कोविड-19 ने आयपीएलच्या बायो बबलमध्ये ( IPL Bio Bubble ) शिरकाव करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही दिल्ली कॅपिटल्स कॅम्पमध्ये अनेक कोविड-19 च्या पॉझिटिव्ह केसेस आढळून आल्या होत्या. मिशेल मार्श आणि टिम सेफर्ट यांच्या व्यतिरिक्त, सपोर्ट स्टाफच्या दोन सदस्यांसह चार सदस्य कोविड-19 चाचणीत पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर त्यांना संघात सामील करुन घेण्यापूर्वी, प्रत्येकजण एक आठवडा आयसोलेशनमध्ये राहिला होता.

संपूर्ण दिल्ली कॅपिटल्स संघाला ( Delhi Capitals Team ) अलग ठेवण्यात आले होते आणि त्यांना पुण्यात पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामने खेळायचे होते, परंतु त्यांचे हे सामने मुंबईला हलवण्यात आले. पंजाबविरुद्धच्या सामन्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा संघ केवळ एका सराव सत्रात भाग घेऊ शकला होता. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगच्या कुटुंबातील एका सदस्यालाही कोविड-19 ची लागण झाली होती. त्यानंतर पाँटिंगला देखील पाच दिवस आयसोलेशनमध्ये होते.

हेही वाचा - IPL 2022 RR vs PBKS : यशस्वी जैस्वालच्या दमदार खेळीनंतर दिग्गज खेळाडूने केले मोठे वक्तव्य, म्हणाला..!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.