बर्मिंगहॅम: कॉमनवेल्थ गेम्स 2022 मधील क्रिकेटचा सेमीफायनल सामना भारतीय महिला संघ आणि आणि इंग्लंड महिला संघ यांच्यात ( INDW vs ENGW ) खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघाला 4 धावांनी पराभूत ( India women won by 4 runs ) केले. त्याचबरोबर भारतीय संघाने फायनलमध्ये धडक मारली आणि आपले पदक निश्चित केले आहे.
या सामन्यात भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने ( Captain Harmanpreet Kaur ) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात 164 धावा केल्या होत्या. त्याचवेळी लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाला 20 षटकांत 6 गडी गमावून केवळ 160 धावा करता आल्या. त्यामुळे भारतीय संघाने 4 धावांनी सामना जिंकला.
-
🇮🇳🇮🇳#B2022 pic.twitter.com/TRENEnwp47
— BCCI Women (@BCCIWomen) August 6, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">🇮🇳🇮🇳#B2022 pic.twitter.com/TRENEnwp47
— BCCI Women (@BCCIWomen) August 6, 2022🇮🇳🇮🇳#B2022 pic.twitter.com/TRENEnwp47
— BCCI Women (@BCCIWomen) August 6, 2022
उपकर्णधार स्मृती मंधाना हिने धमाकेदार अर्धशतक -
-
Innings Break!
— BCCI Women (@BCCIWomen) August 6, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
61(32) from @mandhana_smriti & 44*(31) from @JemiRodrigues guide #TeamIndia to a total of 164/5 on the board.
Over to our bowlers now 🫡
Scorecard - https://t.co/ex8lGZQVs1 #INDvENG #B2022 pic.twitter.com/PWqc3alOdn
">Innings Break!
— BCCI Women (@BCCIWomen) August 6, 2022
61(32) from @mandhana_smriti & 44*(31) from @JemiRodrigues guide #TeamIndia to a total of 164/5 on the board.
Over to our bowlers now 🫡
Scorecard - https://t.co/ex8lGZQVs1 #INDvENG #B2022 pic.twitter.com/PWqc3alOdnInnings Break!
— BCCI Women (@BCCIWomen) August 6, 2022
61(32) from @mandhana_smriti & 44*(31) from @JemiRodrigues guide #TeamIndia to a total of 164/5 on the board.
Over to our bowlers now 🫡
Scorecard - https://t.co/ex8lGZQVs1 #INDvENG #B2022 pic.twitter.com/PWqc3alOdn
भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घतल्यानंतर भारताची उपकर्णधार स्मृती मंधाना हिने धमाकेदार अर्धशतक ( Vice-captain Smriti Mandhana half-century ) झळकावले. तिच्या अर्धशतकी आणि जेमिमाह रॉड्रिगेज हिच्या नाबाद 44 धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने इंग्लंडला विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाने ताबडतोड सुरुवात केली. आणि पहिल्या विकेटसाठी 2.5 षटकांत 28 धावा जोडल्या. त्यानंतर इंग्लंड संघाने आपले फलंदाजीतील आक्रमण सुरू ठेवले आणि प्रत्येक वेळी लक्ष्य आपल्या हाताबाहेर जाणार नाही याची काळजी घेतली.
दिप्ती शर्माने सर्वोत्कृष्ट गोलंदाजी -
-
#TeamIndia through to the FINALS of #CWG2022 🎉🥳 pic.twitter.com/Bswbcq4L2h
— BCCI Women (@BCCIWomen) August 6, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#TeamIndia through to the FINALS of #CWG2022 🎉🥳 pic.twitter.com/Bswbcq4L2h
— BCCI Women (@BCCIWomen) August 6, 2022#TeamIndia through to the FINALS of #CWG2022 🎉🥳 pic.twitter.com/Bswbcq4L2h
— BCCI Women (@BCCIWomen) August 6, 2022
यावेळी इंग्लंडसाठी सलामीवीर फलंदाज डॅनी वॅट ( Opener batter Danny Watt ) हिने 35 धावांची झंजावाती खेळी केली. तिच्याशिवाय कर्मधार नॅट सिव्हर हिने 41, ऍमी जोन्स हिने 31 धावा जोडत इंग्लंड संघाला लक्ष्याच्या जवळ पोहचवले. यावेळी भारतासाठी गोलंदाजीमध्ये दिप्ती शर्माने ( Bowler Deepti Sharma ) सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करून 4 षटकांत 18 धावा देत 1 विकेट घेतली. याशिवाय स्नेह राणा हिने आपल्या 3 षटकात 19 धावा देत 1 विकेट आपल्या नावे केली. तर भारतीय संघाने उत्तम क्षेत्ररक्षणाचे दर्शन घडवतं इंग्लंडच्या 2 फलंदाजांना धावबाद केले. भारताने सामन्याच्या शेवटी चांगली गोलंदाजी करत सामन्यात पकड मजबूत केली.
अतिम सामना रविवार 7 ऑगस्टला -
दरम्यान, आता कॉमनवेल्थ गेम्स 2022 ( CWG 2022 ) मधील क्रिकेट स्पर्धांचा अतिम सामना रविवार 7 ऑगस्ट रोजी आयोजित केला आहे. यावेळी दुसऱ्या संघाचा निर्णय आज रात्री दुसऱ्या उपांत्य फेरीतून मिळणार आहे. शिवाय दोन्ही सामन्यात पराभूत झालेल्या संघांमध्येही कांस्य पदकासाठीची लढत होणार आहे.
हेही वाचा - CWG 2022 : अविनाश साबळेने स्टीपलचेसमध्ये जिंकले रौप्यपदक