मुंबई - भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर स्मृती मंधाना तिच्या फलंदाजीसह क्यूट लूक्समुळे सतत चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी भारत विरुद्ध इंग्लंड महिला कसोटी सामन्यातील स्मृतीचा एक फोटोही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. यादरम्यान, एका चाहत्याने तुला लग्नासाठी कसा मुलगा आवडेल ? असा प्रश्न स्मृतीला विचारला. तेव्हा तिने या प्रश्नावर दिलेले क्यूट उत्तर प्रचंड व्हायरल होत आहे.
एका वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मोबाईल संदेशाद्वारे स्मृतीला एका चाहत्याने, तुला लग्नासाठी कसा मुलगा आवडेल, खूप श्रीमंत की सामान्य? असा प्रश्न विचारला. चाहत्याच्या प्रश्नावर स्मृती लाजली. तिने लाजून काय हे काहीही असं म्हणून अगदी क्यूटपणे प्रश्नाचे उत्तर देणे टाळले.
स्मृती स्थानिक क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारी भारताची एकमात्र महिला क्रिकेटर आहे. १७ वर्षांची असताना २०१३ मध्ये तिने भारतीय संघात पदार्पण केले. ती भारतीय महिला संघातून सर्वांत जलदगतीने २ हजार धावा करणारी क्रिकेटपटू आहे. तिने वयाच्या १९ व्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावले आहे. याशिवाय तिने नुकतीच पार पडलेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत पहिल्या डावात अर्धशतक झळकावत आपली छाप सोडली.
इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघ पिछाडीवर...
सलामीवीर टॅमी ब्यूमोंट (८७) आणि नताली सीवर (७४) या दोघींच्या नाबाद वैयक्तिक अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंड महिला संघाने भारतीय महिला संघाचा पहिल्या एकदिवसीय सामन्यात ८ गडी राखून पराभव केला. भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकात ८ बाद २०१ धावा केल्या होत्या. भारताने दिलेले हे आव्हान इंग्लंडने टॅमी आणि नतालीने तिसऱ्या गड्यासाठी केलेल्या नाबाद शतकी भागिदारीच्या जोरावर ३४.५ षटकात दोन गड्याचा मोबदल्यात सहज पूर्ण केले. इंग्लंडने या विजयासह तीन सामन्याच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.
हेही वाचा - भारतीय महिला क्रिकेटपटू अंशुला राव उत्तेजक चाचणीत दोषी, ४ वर्षांची बंदी
हेही वाचा - ENG vs SL : श्रीलंकन क्रिकेटपटूंची इंग्लंडच्या रस्त्यावर सिगारेट पार्टी; तिघांचे निलंबन, पाहा व्हिडिओ