नवी दिल्ली : लेस्बियन डॅनियल व्याट 2019 पासून फुटबॉल एजंट जॉर्जि हॉजसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. या दोघींनीही गुरुवारी साखरपुडा केला. सोशल मीडियावर फोटो शेअर करून, व्याटने लिहिले 'माय फाॅरेव्हर' लिहिले. डॅनियल आणि हॉज दोघींनीही 2019 मध्ये डेट करायला सुरूवात केली. त्या चार वर्षांपासून लंडनमध्ये राहत आहेत. दोघेही त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे बोलतात आणि सोशल मीडियावर फोटो शेअर करत राहतात. क्रिकेटर डॅनियलने सगळ्यांसोबत ही बातमी शेअर करताच चाहत्यांनी या जोडप्याचे अभिनंदन करण्यास सुरवात केली आहे.
व्याटने एकदा विराट कोहली प्रपोज केले होते : डॅनियल व्याट इंग्लंडच्या क्रिकेट संघात खेळत आहे. तिने नुकत्याच संपलेल्या महिला टी -20 विश्वचषक 2023 च्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. व्याटने एकदा विराट कोहली देखील प्रपोज केले आहे. विराटला प्रपोज केल्यानंतर ती चर्चेत आली. डॅनियलने सोशल मीडियावर 'कोहली मॅरी मी' असे लिहिले होते. कोहलीने यावर प्रतिक्रिया दिली नव्हती.
डॅनियल महिला प्रीमियर लीगमध्ये खेळणार नाही : ही 2014 ची घटना आहे. या दोघांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. डॅनियल महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) 2023 मध्ये खेळताना दिसणार नाही. कारण कोणत्याही टीमने तिला डब्ल्यूपीएल लिलावात विकत घेतले नाही. महिला प्रीमियर लीग 4 मार्चपासून सुरू होणार आहे. ज्यामध्ये पाच संघ सहभागी होत आहेत. सर्व डब्ल्यूपीएल सामने मुंबईतील डी. वाय पाटील आणि ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळले जातील. व्याट महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) 2023 लिलावात विकली गेली नाही आणि टी -20 लीगचा भाग होणार नाही. या स्पर्धेसाठी निवड न झाल्याबद्दल निराशा व्यक्त करण्यासाठी तिने ट्विटरवर पोस्ट शेअर केली.
डॅनियलने कोणताही कसोटी सामना खेळला नाही : हंगामात 22 सामने खेळले जातील आणि अंतिम सामना 26 मार्च रोजी खेळला जाईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंडसाठी डॅनियलने 102 एकदिवसीय आणि 143 टी -20 सामने खेळले आहेत. तिने एकदिवसीय सामन्यात 1776 धावा केल्या आहेत आणि 27 विकेट्स घेतल्या आहेत. डॅनियलने टी -20 मध्ये 2369 धावा केल्या आहेत आणि 46 विकेट घेतल्या आहेत. डॅनियलने एकदिवसीय आणि टी -20 मध्ये 2-2 शतके पुर्ण केले आहेत. तिने अद्याप कोणताही कसोटी सामना खेळला नाही.