ETV Bharat / sports

Ambati Rayudu : अंबाती रायुडू नवी राजकीय इनिंग सुरू करण्याच्या तयारीत, लवकरच होणार खुलासा

आयपीएल जिंकल्यानंतर अंबाती रायुडूने 8 जून रोजी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांची भेट घेतली. त्यानंतर तो राज्यातील मतदारसंघांना भेट देत लोकांची नाडी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. यावरून त्याच्या राजकारणातील एंट्रीच्या चर्चांना उधाण आले आहे.

Ambati Rayudu
अंबाती रायुडू
author img

By

Published : Jun 30, 2023, 4:47 PM IST

गुंटूर : 2023 च्या आयपीएल हंगामानंतर क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेणारा अंबाती रायुडू आता राजकारणात प्रवेश करण्यास सज्ज झाला आहे. रायुडू आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांच्या सत्ताधारी युवाजन श्रमिक रयथू काँग्रेस पार्टी (YSRCP) ची सदस्यता घेण्याची शक्यता आहे. आयपीएल जिंकल्यानंतर त्याने 8 जून रोजी मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांची भेट घेतली होती.

  • Had a great meeting with honourable CM YS Jagan Mohan Reddy garu along with respected Rupa mam.and csk management to discuss the development of world class sports infrastructure and education for the underprivileged. Govt is developing a robust program for the youth of our state pic.twitter.com/iEwUTk7A8V

    — ATR (@RayuduAmbati) June 8, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

रायुडू ग्रामीण भागाला भेट देत आहे : 37 वर्षीय अंबाती रायुडूने 29 मे रोजी चेन्नई सुपर किंग्जसाठी शेवटचा आयपीएल सामना खेळला. त्यानंतर त्याने त्याच्या मूळ गुंटूर जिल्ह्याच्या दौऱ्यात राजकारणात जाण्याचे हेतू स्पष्ट केले. अंबाती रायुडू हा जगनमोहन रेड्डी यांच्या सत्ताधारी युवाजन श्रमिक रायथू काँग्रेस पक्षाकडून त्याची नवीन राजकीय इनिंग सुरू करेल. स्थानिक माध्यमांत म्हटले आहे की, अंबाती रायुडू गेले काही दिवस तळाच्या पातळीवरील लोकांना भेडसावणाऱ्या समस्या समजून घेण्यासाठी गुंटूर जिल्ह्याला भेट देत आहे. रायुडूने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आंध्र प्रदेश आणि राज्याच्या विभाजनानंतर आता तेलंगणाचा भाग असलेल्या हैदराबाद या दोन्ही संघांचे प्रतिनिधित्व केले आहे.

लोकांच्या सेवेसाठी मी लवकरच आंध्र प्रदेशच्या राजकारणात प्रवेश करणार आहे. त्याआधी मी जिल्ह्याच्या विविध भागात जाऊन लोकांची नाडी जाणून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचे ठरवले आहे. - अंबाती रायुडू

लोकसभा निवडणूक लढवण्याच्या चर्चांना नकार : अंबाती रायुडू लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्या दूर करण्यासाठी तो काय करू शकतो यासाठी गुंटूरच्या ग्रामीण भागात भेट देत आहे. त्याला एका ठोस कृती आराखड्यासह राजकारणात प्रवेश करायचा आहे, असे त्याने म्हटले आहे. त्यासाठी कोणता प्लॅटफॉर्म निवडणार हे तो काही दिवसांनी सांगणार आहे. मात्र त्याने 2024 ची लोकसभा निवडणूक लढवण्याचा विचार करत असल्याच्या अनुमानांना नकार दिला.

अंबाती रायुडूची कारकीर्द : रायुडूने भारतासाठी 55 वनडे आणि 6 टी 20 सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 47.06 च्या सरासरीने 1,694 धावा केल्या आहेत. नाबाद 124 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. टी 20 च्या 6 सामन्यात त्याने 42 धावा केल्या आहेत.

हेही वाचा :

  1. Ambati Rayudu Retirement : 5 वेळचा चॅम्पियन अंबाती रायडू आयपीएलमधून निवृत्त, वाचा कारकीर्द

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.