ETV Bharat / sports

Cricket World Cup 2023 : दक्षिण आफ्रिका 'चोकर्स' टॅग काढणार का? - डेव्हिड मिलर

ICC क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेला जागतिक क्रिकेटमधील 'चॉकर्स' या टॅगपासून मुक्त व्हायचंय. त्यामुळं संघानं जोरदार तयारी केलीय. क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, एडन मार्कराम सारख्या खेळाडूंचा संघाला नक्की फायदा होणार आहे.

Cricket World Cup 2023
Cricket World Cup 2023
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 4, 2023, 6:39 PM IST

हैदराबाद : पुरुष क्रिकेट विश्वचषक 2023 साठी जग सज्ज होत असताना, विजेतेपद जिंकण्याच्या दावेदारांपैकी एक असलेल्या दक्षिण आफ्रिकेला जागतिक क्रिकेटमधील 'चॉकर्स' या टॅगपासून मुक्त व्हायचंय. दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या संतुलित दिसत आहे. त्यामुळं विश्वचषक जिंकण्यासाठी ते परिपूर्ण प्रयत्न करणार आहेत.

1. अनुभवी फलंदाजी : या संघात अनेक अनुभवी फलंदाज आहेत. जे स्पर्धा जिंकण्यास मदत करु शकतात. त्यांची एक महत्त्वाची ताकद त्यांच्या फलंदाजीत आहे. क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, एडन मार्कराम सारखे खेळाडू आंतरराष्ट्रीय खेळाडूचा अनुभवाचा संघाला नक्की फायदा होणार आहे. संघात दबावाची परिस्थिती हाताळण्याची क्षमता संघाला स्थिरता प्रदान करू शकते.

आफ्रिकेसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू : क्विंटन डी कॉक आक्रमक खेळासाठी ओळखला जातो. स्फोटक सुरुवात करण्याची आणि पॉवरप्लेचा फायदा घेण्याची त्याची क्षमता दक्षिण आफ्रिकेला महत्त्वपूर्ण फायदा होऊ शकतो. पदार्पणापासूनच तो भारतात दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्यानं 145 सामन्यांमध्ये 17 शतकं, 30 अर्धशतकांसह 44.8 च्या सरासरीनं 6 हजार 176 धावा केल्या आहेत.

संघाची मधली फळी मजबूत : डेव्हिड मिलर, हेनरिक क्लासेन आणि एडन मार्कराम यांच्यामुळं संघाची मधली फळी मजबूत आहे. मिलर त्याच्या फिनिशिंग आणि मॅच-विनिंग खेळण्याच्या कौशल्यासाठी ओळखला जातो. त्यानं 137 एकदिवसीय सामन्यांमध्ये 42.6 च्या सरासरीनं आणि 103.3 च्या प्रभावी स्ट्राइक रेटनं 4 हजार 90 धावा केल्या आहेत. एडन मार्कराम आणि हेनरिक क्लासेन खूप चांगले फिरकीपटू आहेत. मार्करामनं 96.3 च्या स्ट्राइक रेटसह 35.4 च्या सरासरीनं 1 हजार 665 धावा केल्या आहेत, तर अलीकडेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध 174 धावांची खेळी खेळलेल्या हेनरिक क्लासेनं चांगली कामगिरी केलीय. आतापर्यंत त्यानं 41.3 च्या सरासरीनं 1 हजार 323 धावा केल्या आहेत.

जबरदस्त गोलंदाजी : कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी आणि मार्को जॅनसेन हे शक्तिशाली त्रिकूट अगदी निपुण फलंदाजांसाठी घातक ठरू शकतात. रबाडा, त्याच्या घातक गोंलदाजीमुळं विरोधी फलंदाजांची फळी उध्वस्त होऊ शकते. लुंगी एनगिडी हा चेंडू दोन्ही बाजूंनी स्विंग करण्याच्या क्षमतेसाठी ओळखला जातो. मार्को जॅनसेन बहुतेक खेळपट्ट्यांमधून बाऊन्स काढू शकतो. रबाडानं 92 एकदिवसीय सामन्यांमध्ये 27.8 च्या सरासरीनं 144 बळी घेतले असून 16 धावांत 6 बळी ही त्याची सर्वोत्तम आकडेवारी आहे. एनगिडी त्याच्या हळूवार गोलंदाजीमुळं महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. त्यानं 48 एकदिवसीय सामन्यांमध्ये 27.6 च्या सरासरीनं 78 बळी घेतले आहेत. दक्षिण आफ्रिकेकडं तबरेझ शम्सी आणि केशव महाराज ही दर्जेदार फिरकी जोडी आहे. फिरकीपटू शम्सी आपल्या गोलंदाजीनं फलंदाजांना चकवा देऊ शकतो. त्यानं 46 एकदिवसीय सामन्यांमध्ये 5.50 च्या इकॉनॉमी रेटनं 63 विकेट घेतल्या आहेत. महाराज या डावखुऱ्या फिरकीपटूनं 31 सामन्यांत 4.69 इकॉनॉमी रेटनं 37 विकेट्स आहेत.

एनरिक नॉर्टजेची अनुपस्थिती : दुखापतीमुळं वेगवान गोलंदाज ॲनरिक नॉर्टजेची अनुपस्थिती ही दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वात मोठी अस्वस्थता आहे. नॉर्टजेच्या गोलंदाजीचा वेग प्रचंड आहे. तो नियमितपणे 145+ किमी प्रतितास वेगानं गोलंदाजी करू शकतो. त्याला भारतात खेळण्याचाही भरपूर अनुभव होता. आणखी एक वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झी याला संघात स्थान देण्यात आलं आहे. परंतु तो अद्याप भारतात एकही सामना खेळू शकलेला नाही. त्यानं केवळ 6 सामने खेळले असून 29.45 च्या सरासरीनं 11 विकेट घेतल्या आहेत.

फिरकी गोलंदाजीची कमाल : शम्सी आणि महाराज विश्वासार्ह फिरकीपटू असताना, त्यांच्यापैकी एकाला दुखापत झाल्यास फारसा बॅकअप मिळणार नाहीय. जानेवारी 2022 पासून, दक्षिण आफ्रिकेनं एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यांच्या व्यतिरिक्त फक्त एक फिरकी गोलंदाज ब्योर्न फॉर्च्युइनं 5.64 च्या इकॉनॉमीसह 29.16 च्या सरासरीने चार सामन्यांत सहा विकेट्स घेतल्या आहेत.

तरुणांच्या खेळाडूंचा संघात समावेश : तरुणांच्या खेळाडूंचा संघात समावेश करणं ही एक महत्त्वाची संधी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुलनेनं नवीन असलेले मार्को जॅनसेनसारखे खेळाडू नवीन ऊर्जा आणि उत्साह आणतात. त्यांचा निर्भय दृष्टीकोन, कामगिरी करण्याची क्षमता स्पर्धेच्या महत्त्वपूर्ण क्षणांमध्ये आश्चर्यकारक घटक प्रदान करण्यासाठी वापरली जाऊ शकते.

दुखापतीचा संघाला धोका : प्रमुख खेळाडूंमधील दुखापती हा आणखी एक महत्त्वाचा धोका संघाला आहे. एखाद्या महत्त्वाच्या खेळाडूला स्पर्धेदरम्यान दुखापत झाली, तर त्यामुळं संघाचा समतोल बिघडू शकतो. शिवाय, महत्त्वाच्या खेळाडूंमधील फॉर्म गमावणं, विशेषत: फलंदाजी विभागात, संघाच्या एकूण कामगिरीवर गंभीर परिणाम होऊ शकतो. शेवटी, दक्षिण आफ्रिकेच्या विश्वचषक संघात युवा आणि अनुभव खेळाडूंच मिश्रण आहे. संघाचे यश त्यांच्या सामर्थ्याचा फायदा घेण्याच्या, त्यांच्या कमकुवतपणाकडं लक्ष देण्याच्या, उपलब्ध संधींचा लाभ घेण्याच्या क्षमतेवर अवलंबून असेल. काळजीपूर्वक नियोजन, धोरणात्मक निर्णय घेणे आणि सामूहिक सांघिक प्रयत्नांसह, दक्षिण आफ्रिकीकेकडं ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत जोरदार प्रभाव पाडण्याची क्षमता आहे.

हेही वाचा -

  1. Cricket World Cup 2023 : विश्वचषकाचा भव्य उद्घाटन सोहळा रद्द, सर्व संघांच्या कर्णधारांचं फोटो सेशन होईल
  2. Cricket World Cup 2023 : लहानपणी अभ्यासाऐवजी केली क्रिकेटची निवड, आज विश्वचषक संघातील महत्वाचा खेळाडू आहे इशान किशन
  3. Cricket World Cup 2023 : पाचवेळचा विश्वविजेता ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा विजेतेपदाचा दावेदार, जाणून घ्या संघाची ताकद आणि कमजोरी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.