ETV Bharat / sports

Cricket World Cup 2023 : ऑस्ट्रेलिया जिंकणार सहावा विश्वकप? - सहाव्या विजेतेपदासाठी लक्ष्य

Cricket World Cup 2023 : पाच वेळचा चॅम्पियन ऑस्ट्रेलिया 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार्‍या आयसीसी क्रिकेट वर्ल्डमध्ये त्यांच्या मोहिमेला सुरुवात करताना सहाव्या विजेतेपदासाठी लढणार हे निश्चित आहे. ऑस्ट्रेलियाची बलस्थानं आणि कमजोरीवर एक नजर टाकूया...

Cricket World Cup 2023
Cricket World Cup 2023
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 3, 2023, 7:00 PM IST

हैदराबाद : येत्या 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार्‍या 2023 क्रिकेट विश्वचषकाची क्रिकेट रसिक आतुरतेने वाट पाहात आहेत. या मेगा इव्हेंटला अवघे दोन दिवस उरले असून, विश्वचषकातील सर्वात यशस्वी संघाच्या तयारीचं मूल्यांकन करणं आवश्यक आहे. पाचवेळा विजेतेपदाचा विक्रम जिंकणारा ऑस्ट्रेलिया फेव्हरेटपैकी एक म्हणून स्पर्धेत प्रवेश करेल. वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियानं जूनमध्ये भारताचा पराभव केला होता. आता देखील विश्वचषक विजेतेपदाची चव चाखायला ऑस्ट्रेलियाला आवडेल.

ऑस्ट्रेलियाचं सामर्थ्य :

जबरदस्त गोलंदाजी : ऑस्ट्रेलियाकडं पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड यांच्यासारख्या मजबूत, अष्टपैलू गोलंदाजीचे आक्रमक खेळाडू आहेत. कमिन्स, स्टार्क आणि हेझलवूड हे त्रिकूट सर्वात घातक गोलंदाजी करण्यात पटाईत आहे. वेगवान गोलंदाजी करण्याची त्यांची क्षमता, तसंच चेंडू दोन्ही बाजूंनी स्विंग करण्याची त्यांच्याकडं जादू आहे. खेळपट्टीवरून चेंडू बाऊन्स करण्याची कला देखील त्यांच्यात आहे. लेगस्पिनर ॲडम झाम्पाच्या गोलंदाजीमुळं तर विरोधी संघाला घाम फुटतो.

भारतीय खेळपट्ट्यांवर खेळण्याचा अनुभव : जानेवारी 2023 पासून, मिचेल स्टार्कनं भारतीय भूमीवर केवळ चार एकदिवसीय सामन्यांमध्ये 24.66 च्या सरासरीनं नऊ विकेट्स घेतल्या आहेत. हेझलवूड दुखापतींमुळं काही दिवस संघाच्या बाहेर होता. पण त्याला भारतीय खेळपट्ट्यांवर खेळण्याचा मोठा अनुभव आहे. आतापर्यंत त्यानं 74 एकदिवसीय सामन्यांमध्ये 26.4 च्या सरासरीनं 4.70 च्या इकॉनॉमीनं 116 विकेट्स घेतल्या आहेत. कमिन्सनं 77 एकदिवसीय सामन्यांमध्ये 28 च्या सरासरीनं आणि 5.23 च्या इकॉनॉमीनं 126 विकेट्स घेतल्या आहेत. भारतीय परिस्थिती आणि खेळपट्ट्या लक्षात घेता ॲडम झाम्पाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. भारतीय खेळपट्ट्यांवर 16 एकदिवसीय सामन्यांमध्ये 30.77 च्या सरासरीनं 27 बळी घेण्याचा त्याचा विक्रम खूप चांगला आहे.

स्फोटक फलंदाजी : डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस स्टॉइनिस सारख्या पॉवर हिटर्समुळं दिलेल्या लक्ष्याचा आक्रमकपणे पाठलाग करणं सहज शक्य होतं. स्टीव्ह स्मिथचा अनुभव आणि मार्नस लॅबुशेनची उदयोन्मुख प्रतिभा खेळाला चालना देऊ शकते. जर ओपनींग खेळाडूंना फारसं काही करता आलं नाही तर, मधल्या फळीतील खेळाडू संघाला काहीसं स्थैर्य मिळवून देऊ शकतात. या वर्षी डेव्हिड वॉर्नरनं भारताविरुद्ध सलग तीन अर्धशतके केली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यानं 9 एकदिवसीय सामन्यांमध्ये 390 धावांसह ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा केल्या होत्या. या वर्षी ऑस्ट्रेलियासाठी मार्श दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. ज्यानं 10 सामन्यांमध्ये 121.57 च्या सरासरीनं 417 धावा केल्या आहेत. चार अर्धशतकांसह 46.33 च्या सरासरीनं त्याचा धावा करण्याचा रेट आहे. मार्नस लॅबुशेननं यावर्षी वनडेमध्ये सर्वाधिक धावा केल्या असून त्यानं 10 सामन्यांमध्ये 51.55 च्या सरासरीनं धाव केल्या आहेत. ज्याचा स्ट्राइक रेट 93.17 आहे.

अष्टपैलू क्षमता : संघात कॅमेरॉन ग्रीन, मार्कस स्टॉइनिस, मिचेल मार्श सारख्या प्रतिभावान अष्टपैलू खेळाडूंचा समावेश आहे, जे गोलंदाजी देखील करू शकतात, तर ग्लेन मॅक्सवेल, मार्नस लॅबुशेन आणि ट्रॅव्हिस हेड कर्णधाराला गुगली गोलंदाजीत मदत करतील. ग्लेन मॅक्सवेलला खेळपट्टीची मदत मिळाल्यास तो 10 षटके टाकू शकतो. राजकोट येथे भारताविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्यानं 10 षटकांचा पूर्ण कोटा टाकला होता. सामना ऑस्ट्रेलियानं जिंकला होता. स्टॉइनिसनं या वर्षात 7 एकदिवसीय सामन्यात 7 बळी घेतले आहेत. ग्रीननं 7 सामन्यात 5 बळी घेतले आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या संघाची कमजोरी : पॅट कमिन्स, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क यांच्यासह काही प्रमुख खेळाडू एकदिवसीय सामन्यांमधून दुखापतीमुळं बाहेर होते. या खेळाडूंना स्पर्धेदरम्यान तंदुरुस्तीच्या समस्येचा सामना करावा लागला तर, संघ लक्षणीयरीत्या कमकुवत होऊ शकतो. ज्यामुळं त्यांच्या महत्त्वपूर्ण सामन्यांमधील कामगिरीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषत: एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत प्रवेश करण्यापूर्वी तुम्हाला जास्तीत जास्त सामने खेळायचे आहेत. पण पॅट कमिन्सनं दोन, ग्लेन मॅक्सवेलने एक, स्टीव्ह स्मिथनं सहा आणि मिचेल स्टार्कनं चार सामने खेळले आहेत.

स्पिन बॉलिंग डेप्थ : ॲडम झाम्पा हा ऑस्ट्रेलियासाठी एकमेव स्पेशलिस्ट स्पिनर आहे. डाउन अंडरच्या टीममध्ये बॅकअप स्पेशालिस्ट स्पिनरची कमतरता आहे. भारतीय खेळपट्ट्या फिरकीा पटूसांठी अनुकूल आहेत, हे लक्षात घेऊन दुसरा विश्वसनीय फिरकी पटूचा पर्याय नसणं हे संघासाठी आव्हान ठरू शकतं.

युवा प्रतिभा : जोश इंग्लिस, ॲलेक्स कॅरी, मार्नस लॅबुशेन आणि कॅमेरॉन ग्रीन सारख्या युवा खेळाडूंचा समावेश ऑस्ट्रेलियाला भविष्यात चांगला फायदा होऊ शकतो. या खेळाडूंना विश्वचषकादरम्यान चांगला अनुभव मिळू शकतो. डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉइनिस सारख्या खेळाडूंचं वय वाढत असल्यानं त्यांच्यासाठी हा शेवटचा एकदिवसीय विश्वचषक असेल. पुढील मेगा इव्हेंटमध्ये चांगली कामगिरी करणं, देशाचं प्रतिनिधित्व करणं हा तरुणांसाठी एक उत्तम अनुभव असेल.

अनुकूलता : भारतातील उष्ण आणि दमट हवामान आणि खेळपट्टीची परिस्थिती अनुकूलतेची आवश्यकता असते. परदेशी खेळाडूंसाठी हे नेहमीच मोठं आव्हान असतं. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंच्या विविध परिस्थितींशी जुळवून घेण्याच्या क्षमतेचा फायदा त्यांना मिळू शकतो. परिस्थितीची पर्वा न करता ते स्पर्धात्मक राहतील याची खात्री करून घेऊ शकतात. राजकोटमधील तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात भारताविरुद्ध अर्धशतक झळकावणारे मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ यांनी मत व्यक्त केलं होतं, की राजकोटमधील परिस्थिती त्यांच्या कारकिर्दीतील आतापर्यंतची सर्वात उकाड्याची होती.

प्रबळ विरोध : भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड यांसारख्या संघांचा सामना ऑस्ट्रेलियाला करावा लागणार आहे. या संघाकंडं चांगली गोलंदाजी करणारे खेळाडू आहेत. त्यामुळं ऑस्ट्रेलिया संघाला तगड्या प्रतिस्पर्धी संघांचा समाना करावा लागणार आहे.

दबावाची परिस्थिती : ऑस्ट्रेलियानं सर्वाधिक (पाच) विश्वचषक जिंकले असले, तरी काही नवीन खेळाडूंसाठी दबावात खेळणं महागात पडू शकतं. संघाला दबावात खेळण्यासाठी मानसिक, शारीरिक, रणनीती तयार करणं आवश्यक आहे. शेवटी, ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषक संघात अनुभव, प्रतिभा आणि क्षमता यांचं मिश्रण आहे. टूर्नामेंटमधील त्यांचं यश त्यांच्या सामर्थ्याचा फायदा घेण्याच्या, त्यांच्या कमकुवतपणाचं निराकरण करण्याच्या, संधींचा लाभ घेण्याच्या आणि संभाव्य धोक्यांना प्रभावीपणे नेव्हिगेट करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असेल. धोरणात्मक दृष्टीकोन आणि सामूहिक सांघिक प्रयत्नांमुळं ऑस्ट्रेलियाकडं ट्रॉफी जिंकण्याचा प्रबळ दावेदार होण्याची क्षमता आहे हे नक्की...

हेही वाचा -

  1. Cricket World Cup 2023 : हे आहे भारतातील सर्वात आधुनिक क्रिकेट स्टेडियम, कितीही पाऊस आला तरी मॅच होणार नाही रद्द!
  2. Cricket World Cup 2023 : 'भारत उपांत्य फेरीत नक्कीच प्रवेश करणार', किरण मोरेंची भविष्यवाणी
  3. Cricket World Cup 2023 : सलग दोन विश्वचषकात फायनलमध्ये पराभव, आता तरी न्यूझीलंडचा ट्रॉफीचा दुष्काळ संपणार का?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.