ETV Bharat / sports

Cricket World Cup 2023 : विश्वचषकात कोणत्या संघाचं पारडं जड? कोणता खेळाडू ठरू शकतो 'ट्रम्प कार्ड'? जाणून घ्या प्रत्येक संघाबद्दल सविस्तरपणे - Cricket World Cup prize money

Cricket World Cup 2023 : विश्वचषक २०२३ ला ५ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. १९ नोव्हेंबरपर्यंत ही स्पर्धा चालेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) द्वारे दर चार वर्षांनी वर्ल्डकपचं आयोजन केलं जातं. यंदा कोणता संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे? प्रत्येक संघातील महत्वाचे खेळाडू कोणते? स्पर्धेतील बक्षिसाची रक्कम किती? जाणून घेऊया सविस्तरपणे...

Cricket World Cup 2023
Cricket World Cup 2023
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 30, 2023, 11:55 AM IST

मुंबई Cricket World Cup 2023 : क्रिकेटच्या महाकुंभाला ५ ऑक्टोबरपासून देशात सुरुवात होणार आहे. यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली असून स्पर्धेत सहभागी संघ भारतात दाखल झाले आहेत. याआधी जेव्हा २०११ मध्ये भारतात विश्वचषकाचं आयोजन करण्यात आला होता, तेव्हा टीम इंडिया विजयी ठरली होती. मात्र त्यानंतर झालेल्या दोन वर्ल्डकपमध्ये भारत सेमीफायनलमधून बाहेर पडला होता. यंदा पुन्हा एकदा भारताकडं विजयाची सुवर्ण संधी आहे.

ग्रुप फॉरमॅट : २०२३ चा क्रिकेट विश्वचषक राऊंड-रॉबिन फॉरमॅटमध्ये खेळवला जाईल. विश्वचषकात एकूण १० संघ सहभागी होणार आहेत. प्रत्येक संघ दुसऱ्या संघाशी किमान एकदा भिडेल. त्यापैकी अव्वल चार संघ उपांत्य फेरीत जातील. प्रत्येक उपांत्य फेरीतील विजेते १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना खेळतील.

उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी किती गुणांची आवश्यकता : ९ सामन्यांतील ७ विजय उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करू शकतात. जर दोन संघांचे समान गुण झाले तर चांगला रन रेट असलेला संघ पुढं जाईल. २०१९ मध्ये ही स्थिती उत्पन्न झाली होती. तेव्हा न्यूझीलंड आणि पाकिस्तानचे समान गुण (११) झाले होते. मात्र न्यूझीलंडचा रन रेट चांगला असल्यानं तो संघ उपांत्य फेरीत पोहचला.

संघ कसे पात्र ठरले : भारत या स्पर्धेत यजमान देश म्हणून पात्र ठरला आहे. सात संघ आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक सुपर लीग स्थानानुसार पात्र ठरले. न्यूझीलंड, इंग्लंड, बांग्लादेश, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका हे सात संघ आहेत. तर श्रीलंका आणि नेदरलँड्स यांनी पात्रता फेरीद्वारे विश्वचषकात स्थान मिळवलं.

  • Sri Lanka and Netherlands players hailed the high-intensity #CWC23 Qualifier as they look forward to the main tournament in India 🏆https://t.co/XPgyigNV6V

    — ICC Cricket World Cup (@cricketworldcup) July 9, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

१) अफगाणिस्तान : अफगाणिस्तान संघाकडं काही हार्ड हिटर फलंदाज आणि जबरदस्त फिरकीपटू आहेत. ते कोणत्याही प्रतिस्पर्ध्यांला नेस्तनाबूत करू शकतात. हशमतुल्ला शाहिदी, रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान आणि मोहम्मद नबी हे त्यांचे काही प्रमुख फलंदाज आहेत. अव्वल फिरकीपटू राशिद खान अफगाणिस्तानचा 'ट्रम्पकार्ड' असेल. त्यानं जगभरातील टी २० स्पर्धांमध्ये आपला डंका बजावला आहे.

  • अफगाणिस्तानची टीम : हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम जद्रान, रियाझ हसन, रहमत शाह, नजीबुल्ला झदरान, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल, अजमतुल्ला उमरझाई, राशीद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजलहक फारुकी, अब्दुल रहमान, नवीन उल हक

२) ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियाचा संघ प्रत्येक विश्वचषकात विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असतो. या संघात अनुभवी आणि युवा गोलंदाजांचं उत्तम मिश्रण आहे. उल्लेखनीय म्हणजे, संघात तब्बल १२ अष्टपैलू खेळाडू आहेत, जे कोणत्याही परिस्थितीत चांगली कामगिरी करण्यास सक्षम आहेत. ऑस्ट्रेलिया संघाची मदार स्टीव्ह स्मिथ, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यावर असेल.

  • ऑस्ट्रेलियाची टीम : पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, अ‍ॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, शॉन अ‍ॅबॉट, कॅमेरुन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅबुशेन, मिच मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अ‍ॅडम झम्पा, मिचेल स्टार्क.

३) बांग्लादेश : बांग्लादेशचा संघ या विश्वचषकात डार्क हॉर्स असू शकतो. त्यांच्याकडे सध्या एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मजबूत फिरकी गोलंदाजी युनिट आहे. शाकिब अल हसन आणि मेहंदी हसन यांच्यासारखे धुरंधर फिरकीपटू या संघात आहेत. तसेच त्यांच्याकडं मुस्तफिझूर रहमानच्या रुपानं एक दर्जेदार वेगवान गोलंदाज आहे, जो त्यांच्या वेगवान आक्रमणाचं नेतृत्व करेल.

  • बांग्लादेशची टीम : शाकिब अल हसन (कर्णधार), लिट्टन दास, तन्झिद हसन तमीम, नजमुल हुसेन शांतो, तौहीद ह्रदोय, मुशफिकुर रहीम, महमुदुल्लाह रियाद, मेहंदी हसन, नसुम अहमद, शाक मेहंदी हसन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, शोरीफुल इस्लाम, तनझिम हसन साकिब.

४) इंग्लंड : गतविजेत्या इंग्लंडकडं जॉस बटलर, जॉनी बेअरस्टो आणि बेन स्टोक्स यांच्यासारखे दमदार पॉवर हिटर्स आहेत. विशेष म्हणजे त्यांच्यात कोणतही गोलंदाजी आक्रमण नष्ट करण्याची क्षमता आहे. यासह सॅम करन, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन आणि ख्रिस वोक्स यांसारख्या अष्टपैलू खेळाडूंनी ही टीम सजलीय.

  • इंग्लंडची टीम : जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, गुस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल रशीद, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स, रिस टॉपली, डेव्हिड विली, मार्क वुड, ख्रिस वोक्स.

५) भारत : या विश्वचषकात भारतीय संघाला घरच्या परिस्थितीचा फायदा मिळेल. विश्वचषकापूर्वी टीम इंडियाचा जवळपास प्रत्येक खेळाडू फॉर्ममध्ये दिसतोय. अव्वल पाच फलंदाजांनी संघाच्या धावसंख्येत मोठा हातभार लावला आहे. त्यासह अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि हार्दिक पंड्या देखील चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. या दोघांच्या उपस्थितीमुळे संघाचा समतोल राखला जातो. तसेच वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचं कमबॅक भारतासाठी वरदान सिद्ध होऊ शकतं.

  • भारताची टीम : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.

६) नेदरलँड्स : नेदरलँड्सच्या संघाची सर्वात मोठी ताकद त्यांचे अष्टपैलू खेळाडू बास डी लीडे, तेजा निदामनुरु आणि मॅक्स ओ'डॉड हे आहेत. हा संघ या स्पर्धेत त्यांच्या प्रदर्शनानं सर्वांना आश्चर्यचकित करू शकतो. त्यांच्याकडं मोठ्या-मोठ्या संघांना धक्का देण्याची कुवत आहे. मात्र फिरकी गोलंदाजांसमोर नेदरलँड्सचे फलंदाज ढेपाळतात.

  • नेदरलँड्सची टीम : स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), मॅक्स ओ'डॉड, बास डी लीडे, विक्रम सिंग, तेजा निदामानुरु, पॉल व्हॅन मीकरेन, कॉलिन एकरमन, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, रायन क्लेन, वेस्ली बॅरेसी, साकिब झुल्फिकार, शरीझ अहमद, सायब्रँड एंजेलब्रेक्ट.

७) न्यूझीलंड : न्यूझीलंडचा संघ गेल्या दोन विश्वचषकात उपविजेता होता. मात्र या विश्वचषकात ते दुखापतींशी झुंजत आहेत. कर्णधार केन विल्यमसननं मे २०२३ पासून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. वेगवान गोलंदाज टिम साउदी देखील अंगठ्याच्या दुखापतीतून पूर्णपणे बरा झालेला नाही. मात्र डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टच्या समावेशामुळे संघ मजबूत झाला आहे. यासह डेव्हॉन कॉनवे, मिचेल सँटनर, ग्लेन फिलिप्स आणि लॉकी फर्ग्युसन यांचा भारतात आयपीएल खेळण्याचा चांगला अनुभव आहे.

  • न्यूझीलंडची टीम : केन विल्यमसन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिच सँटनर, ईश सोधी, टीम साउथी, विल यंग.

८) पाकिस्तान : पाकिस्तानची सर्वात मोठी ताकद त्यांची टॉप ऑर्डर फलंदाजी आणि वेगवान गोलंदाजी असेल. नसीम शाह जरी खेळणार नसला तरी त्यांच्याकडं हरिस रौफ आणि शाहीन आफ्रिदीची जोडी आहे. मात्र मधली फळी आणि फिरकी गोलंदाजी त्यांच्यासाठी चिंतेचा विषय असेल. त्यांची मधली फळी विसंगत आहे, जी मोक्याच्या परिस्थितीत कोलमडते.

  • पाकिस्तानची टीम : बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हरिस रौफ, हसन अली, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम.

९) दक्षिण आफ्रिका : दक्षिण आफ्रिकेचा संघ यंदाचा विश्वचषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार असेल. एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर यांची मधली फळी या संघाची ताकद आहे. तसेच ही टीम अनेक मॅच-विनर्सनं भरलेले आहे. यासोबत कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी, मार्को जॅनसेन, तबरेझ शम्सी, केशव महाराज आणि गेराल्ड कोएत्झी या वेगवान आणि फिरकी गोलंदाजांच्या समावेशानं हा संघ संतुलित दिसतो.

  • दक्षिण आफ्रिकेची टीम : टेम्बा बवुमा (कर्णधार), जेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, रिझा हेंड्रिक्स, मार्को जॅनसेन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, अँडिले फेहलुकवायो, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी, रॅसी वॅन डर ड्यूसेन, लिझाद विल्यम्स.

१०) श्रीलंका : अव्वल खेळाडू वानिंदू हसरंगा आणि दुष्मंथा चमेरा यांच्या अनुपस्थितीमुळे श्रीलंकेच्या विश्वचषक जिंकण्याच्या शक्यता धूसर आहेत. तथापि, त्यांच्याकडं अजूनही मथीशा पाथिराना, लाहिरू कुमारा, मथीशा तिक्षा आणि दिनुथ वेललागेसारखे गोलंदाज आहेत. मात्र बाद फेरीत जाण्यासाठी श्रीलंकेच्या फलंदाजांना संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागेल.

  • श्रीलंकेची टीम : दासुन शनाका (कर्णधार), कुशल मेंडिस, कुशल परेरा, पथुम निसांका, लाहिरू कुमारा, दिमुथ करुणारत्ने, सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजया डी सिल्वा, मथीशा तिक्षा, दुनिथ वेललागे, कसुन रजिथा, माथेशा पाथिराना, दिलशान मधुशनाका, दुषाण हेमंथा

बक्षीस रक्कम : आयसीसीनं जाहीर केलं आहे की विश्वचषक विजेत्याला ४ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (सुमारे ३३.२२ कोटी रुपये) बक्षीस म्हणून मिळतील. या स्पर्धेत एकूण १० दशलक्ष डॉलर्सची बक्षीस रक्कम जाहीर करण्यात आली आहे. उपविजेत्याला २ दशलक्ष डॉलर (सुमारे १६.६१ कोटी रुपये) आणि ग्रुप स्टेज गेम्स जिंकणाऱ्या संघांना ४०,००० डॉलर्सची रक्कम दिली जाईल. यासह जे संघ बाद फेरी गाठण्यात अपयशी ठरतील त्यांना प्रत्येकी १,००,००० डॉलर्स (८३.०५ लाख रुपये) मिळतील.

हेही वाचा :

  1. Cricket World Cup 2023 : अक्षर पटेलच्या दुखापतीनंतर अश्विनला संघात कशी मिळाली संधी?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.