ETV Bharat / sports

Cricket World Cup २०२३ : 'आमचे फलंदाज अपयशी ठरले', भारताविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर स्टीव्ह स्मिथची कबुली - क्रिकेट विश्वचषक २०२३

Cricket World Cup २०२३ : रविवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी भारतीय फिरकीपटूंसमोर शरणागती पत्करली. ऑस्ट्रेलियाचा डाव केवळ १९९ धावांत आटोपला. सामन्यानंतर दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथनं आपल्या फलंदाजांचं अपयश मान्य केलं. काय म्हणाला स्टीव स्मिथ जाणून घेण्यासाठी वाचा पूर्ण बातमी...

Steve Smith
स्टीव्ह स्मिथ
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 9, 2023, 4:01 PM IST

चेन्नई Cricket World Cup २०२३ : रविवारी विश्वचषकातील भारताविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ केवळ १९९ धावांवर ऑलआऊट झाला. या सामन्यात कांगारूंचा सहा विकेट्सनं पराभव झाला. सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाचा आघाडीचा फलंदाज स्टीव्ह स्मिथनं कबूल केलं की, ऑस्ट्रेलियन फलंदाज चेपॉकच्या खेळपट्टीवर भारतीय फिरकीपटूंविरोधात अपयशी ठरले.

विकेट फिरकी गोलंदाजीसाठी योग्य होती : भारतासाठी डावखुरा फिरकीपटू रविंद्र जडेजानं (३/३८) धारदार गोलंदाजी केली. त्याला कुलदीप यादव आणि रविचंद्रन अश्विन यांनी चांगली साथ दिली. 'त्यांच्या सर्व फिरकीपटूंनी चांगली गोलंदाजी केली. ही विकेट फिरकी गोलंदाजीसाठी योग्य होती. ते सर्व अतिशय दर्जेदार फिरकीपटू असल्यामुळं त्यांच्यासमोर खेळणं आव्हानात्मक होतं. त्यांनी मिळून गोलंदाजी केल्यानं आम्ही त्यांच्याविरोधात संघर्ष केला', असं स्टीव्ह स्मिथ म्हणाला. या सामन्यात स्मिथ ४६ धावा करून रविंद्र जडेजाच्या गोलंदाजीत क्लिन बोल्ड झाला.

कोहली-राहुलच्या फलंदाजीचं कोतुक केलं : यावेळी बोलताना स्मिथनं विराट कोहली आणि केएल राहुल यांच्या फलंदाजीचंही कौतुक केलं. 'विराट आणि राहुल खूप संयमानं खेळले. ते खरोखरच स्मार्ट क्रिकेट खेळले', असं स्मिथ म्हणाला. 'ही अशा प्रकारची विकेट नव्हती जिथे तुम्ही चौफेर फटकेबाजी करू शकता. ते फक्त २०० धावांचा पाठलाग करत असल्यानं ते संयमानं खेळू शकले. तीन गडी लवकर बाद झाल्यानंतर भागिदारी करणं आवश्यक होतं जी त्यांनी केली', असं स्टीव्ह स्मिथनं सांगितलं.

...तर सामना रोमांचक झाला असता : स्मिथच्या मते, चेपॉकची खेळपट्टी फलंदाजीसाठी अवघड होती. 'ही एक आव्हानात्मक विकेट होती. २०० धावा कमी होत्या. जर आम्ही २५० पर्यंत पोहचलो असतो तर सामना रोमांचक झाला असता. संध्याकाळी दव पडल्यामुळं फलंदाजी करणं थोडं सोपं झालं. आम्ही सुरुवातीलाच तीन विकेट्स घेतल्या आणि चौथीही घेऊ शकलो असतो', असं त्यानं नमूद केलं

स्टॉइनिस टीममध्ये परतला : ऑस्ट्रेलिया आता पुढील सामन्यात लखनौमध्ये दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे. स्मिथनं सांगितलं की लखनौची विकेट त्यांच्यासाठी नवीन असेल कारण ते यापूर्वी तेथे खेळले नाहीत. 'दक्षिण आफ्रिकेची टीम चांगली आहे. या क्षणी ते आत्मविश्वासानं खेळत आहेत. आम्हाला लखनौच्या खेळपट्टीबद्दल काही माहिती नाही', असं तो म्हणाला. मार्कस स्टॉइनिस टीममध्ये परतला असल्याचं स्टीव स्मिथनं सांगितलं. मात्र तो संघात कसा फिट होईल हे पाहावं लागले, असं तो म्हणाला.

हेही वाचा :

  1. Cricket World Cup २०२३ : टीम इंडियाची रणनीती यशस्वी, भारतीय फिरकी त्रिकुटासमोर कांगारूंनी टेकले गुडघे
  2. Cricket World Cup २०२३ : वर्ल्डकपमध्ये डेव्हिड वॉर्नरचा विश्वविक्रम, सचिन, डिव्हिलियर्सला मागं टाकलं
  3. Cricket World Cup 2023 : भारतात आयपीएलमध्ये खेळण्याचा अनुभव विश्वचषकासाठी उपयुक्त ठरेल - पॅट कमिन्स

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.