हैदराबाद Cricket World Cup 2023 : ICC क्रिकेट विश्वचषकाला 2023 आजपासून सुरुवात होत आहे. या विश्वचषकात आशियातील बलाढ्य संघांमध्ये समावेश असलेल्या श्रीलंकेलाही ट्रॉफी जिंकण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. श्रीलंकेचा संघ ७ ऑक्टोबरला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यानं आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. माजी कर्णधार अर्जुन रणतुंगाच्या नेतृत्वाखाली लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर श्रीलंकेच्या संघानं 1996 मध्ये विश्वचषक जिंकला होता. तर 2011 मध्ये, श्रीलंकेचा संघानं भारतासोबत अंतिम सामना खेळला होता, जिथं धोनीनं विजयी षटकार मारुन भारताला विश्वचषक जिंकून दिला होता. आता श्रीलंका पुन्हा एकदा दसुन शनाकाच्या नेतृत्वाखाली 2023 चा विश्वचषक जिंकण्याच्या इराद्यानं मैदानात उतरणार आहे. त्याआधी श्रीलंका संघाची ताकद आणि कमकुवत बाजू कोणत्या आहेत, हे जाणून घेऊया..
-
Sri Lanka reveals its squad for the ICC Men's Cricket World Cup 2023!
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) September 26, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Let's rally behind the #LankanLions 🦁👊#CWC23 pic.twitter.com/niLO7C7RPY
">Sri Lanka reveals its squad for the ICC Men's Cricket World Cup 2023!
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) September 26, 2023
Let's rally behind the #LankanLions 🦁👊#CWC23 pic.twitter.com/niLO7C7RPYSri Lanka reveals its squad for the ICC Men's Cricket World Cup 2023!
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) September 26, 2023
Let's rally behind the #LankanLions 🦁👊#CWC23 pic.twitter.com/niLO7C7RPY
श्रीलंकेची ताकद :
अनुभवी खेळाडू : श्रीलंकेच्या संघात दसून शनाका, कुसल मेंडिस आणि दिमुथ करुणारत्ने सारखे अनुभवी खेळाडू आहेत. जे संघाला स्थिरता प्रदान करतात. या खेळाडूंमध्ये उत्कृष्ट नेतृत्व क्षमताही आहे. श्रीलंकेसाठी, कुसल मॅडिसनं एकदिवसीय सामन्यांच्या 112 डावांमध्ये 32.1 च्या सरासरीनं 2 शतकं आणि 25 अर्धशतकांसह 3215 धावा केल्या आहेत. तर दिमुथ करुणारत्नेनं 44 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1 शतक आणि 11 अर्धशतकांसह 1301 धावा केल्या आहेत.
प्रतिभावाशाली युवा खेळाडू : श्रीलंका संघात प्रतिभाशाली तरुण खेळाडू असल्यानं संघ मजबूत होतो. पथुम निसांका आणि चरिथ असलंका हे संघातील सर्वोत्तम युवा खेळाडूंपैकी एक आहेत. पथुम निसांकानं 41 एकदिवसीय सामन्यांमध्ये 37 च्या सरासरीनं 3 शतके आणि 9 अर्धशतकांसह 1396 धावा केल्या आहेत. तर चरिथ असलंकानं 41 सामन्यात 1 शतक आणि 9 अर्धशतकांसह 41.03 च्या सरासरीनं 1272 धावा केल्या आहेत.
अष्टपैलू खेळाडू : श्रीलंकेकडंही उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहेत. धनंजय डी सिल्वासारखा अष्टपैलू खेळाडू जो बॅट आणि बॉल या दोन्ही बाजूंनी योगदान देऊ शकतो. तो संघात संतुलन आणू शकतो. याशिवाय आशिया चषकात चमकदार कामगिरी करणारा दुनिथा वेलालगेही विश्वचषकात भारतीय खेळपट्ट्यांवर धोकादायक ठरू शकतो.
श्रीलंकेची कमजोरी :
सातत्यपूर्ण कामगिरी : श्रीलंकेचा संघ अलीकडच्या काळात फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीत सातत्यपूर्ण कामगिरी करू शकलेला नाही. दबावाच्या परिस्थितीत संघ सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयशी ठरलाय. तसंच मोठ्या स्पर्धांमध्ये संघाची चांगली कामगिरी न होणं ही चिंतेची बाब ठरू शकते.
वरिष्ठांवर अवलंबित्व : श्रीलंकेचा संघ वरिष्ठ खेळाडूंवर खूप अवलंबून असतो आणि जर ते कामगिरी करू शकले नाहीत तर अननुभवी खेळाडूंवर त्याचा प्रचंड दबाव येतो आणि ते दबावाखाली कोसळतात. विश्वचषकात संघाला या कमकुवतपणावर मात करावी लागणार आहे.
संघात मर्यादित डेप्थ : श्रीलंकेच्या क्रिकेट संघात फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात डेप्थ नाही. दुखापत किंवा खराब फॉर्मच्या बाबतीत, बदली खेळाडू शोधणं ही संघ व्यवस्थापनासाठी मोठी चिंतेची बाब ठरू शकते.
श्रीलंकेला कोणता धोका :
मजबूत प्रतिस्पर्धी : श्रीलंकेला या विश्वचषकात मजबूत फलंदाजी आणि गोलंदाजी असलेल्या संघाचा सामना करावा लागणार आहे. स्टार खेळाडूंनी भरलेल्या संघाचा सामना करणे श्रीलंकेसाठी आव्हान ठरु शकतं.
दुखापती : श्रीलंकेच्या संघाला या स्पर्धेदरम्यान प्रमुख खेळाडूंच्या दुखापतीची समस्या भेडसावत आहे.
अपेक्षांचे दडपण : श्रीलंकेच्या संघावर या विश्वचषकात चमकदार कामगिरी करण्याचे दडपण असेल. हा दबाव या खेळाडूंवरही मात करू शकतो.
श्रीलंकेच्या विश्वचषक संघात अनुभवी खेळाडू आणि आश्वासक प्रतिभेचं मिश्रण आहे. या स्पर्धेत श्रीलंकेला आपल्या कमकुवतपणाचे ताकदीत आणि इतरांच्या ताकदीचे कमकुवतपणात रुपांतर करावे लागणार आहे.
हेही वाचा :