चेन्नई Cricket World Cup : विश्वचषक 2023 च्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सहा गडी राखून पराभव केल्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मा संघाच्या कामगिरीवर खूश होता. मात्र वेगवेगळ्या परिस्थितीत खेळणे हे संघासमोरील सर्वात महत्त्वाचं आव्हान असल्याची कबुली भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मानं दिलीय. तसंच त्या त्या ठिकाणाच्या परिस्थितीनुसार संघात बदल केले जाऊ शकतात असे संकेतही त्यानं दिले.
संघाच क्षेत्ररक्षण उत्तम : शून्यावर बाद झालेला रोहित शर्मा संघाच्या क्षेत्ररक्षणावर मात्र खूश होता. क्षेत्ररक्षण हे असं काहीतरी होतं, ज्यासाठी आम्ही खरोखरच प्रयत्न केले. हा एक उत्तम प्रयत्न असल्याचं तो म्हणाला. चेन्नईसारख्या परिस्थितीमध्ये, कधीकधी ते कठीण असू शकतं. आम्हाला माहित होते की, पिचवर प्रत्येकासाठी उपयुक्त असेल. वेगवान गोलंदाजांना रिव्हर्स स्विंग मिळालं. तसंच फिरकीपटूंनी चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली. हा सर्व एक उत्तम प्रयत्न असल्याचं रोहित शर्मा म्हणाला.
कोहली आणि राहूलचं कौतूक : या सामन्यात भारतानं सर्व आघाडीचे तीन फलंदाज शून्यावर गमावले. संघाची अवस्था 2/3 अशी चिंताजनक होती. यावर बोलताना रोहित म्हणाला, खरं सांगायचं तर मी नर्व्हस होतो. लक्ष्याचा पाठलाग करताना तुम्ही अशी सुरुवात करू इच्छित नाही. ऑस्ट्रेलियाला त्याचं श्रेय दिलं पहिजे. पण, तिथेही काही लूज शॉट्स खेळले, असंही तो म्हणाला. रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखाली फिरकीपटूंनी ऑस्ट्रेलियन संघाला 199 धावांवर रोखल्यानं भारतीय संघाला 200 धावांच टार्गेट मिळालं होतं. रोहित शर्मानं विराट कोहली आणि के.एल. राहुल यांच्या सामना जिंकण्याच्या प्रयत्नांचे कौतुक करत विराट आणि राहीलच्या खेळीला सलाम करत असल्याचं त्यांनी म्हटलंय.
50 धावांनी आम्ही कमी पडलो : आमचा संघ आव्हानात्मक धावसंख्येपेक्षा 50 धावांनी कमी पडल्याचं ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स म्हणाला. 200 पेक्षा कमी धावसंख्येचा बचाव करणं अवघड होत असंही तो म्हणाता. भारताचं गोलंदाजी आक्रमण चांगलं होत मात्र भारतीय फिरकीपटूंनी चांगली गोलंदाजी केली, असं ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स सामन्यानंतर म्हणाला. भारतीय संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कोहलीला डावात मिचेल मार्शनं सोपा झेल सोडल्यानं जीवदान मिळालं. जर असं झालं असंत तर भारतीय संघाची अवस्था 4/10 झाली असती अणि हा स्वप्नवत सुरुवात झाली असती, असंही कमिन्स म्हणाला.
- पुढील सामना अफगाणिस्तान विरोधात : भारताचा पुढील सामना 11 ऑक्टोबरला नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर अफगाणिस्तानशी होणार आहे. तर ऑस्ट्रेलिया लखनौला जात असून जिथं ते 12 ऑक्टोबरला फॉर्मात असलेल्या दक्षिण आफ्रिकेला भिडणार आहेत.
हेही वाचा :
- World Cup २०२३ IND vs AUS : कोहलीला मिळालेलं 'जीवदान' भारतासाठी ठरलं 'वरदान'; पहिल्याच सामन्यात मोडले 'हे' विक्रम
- ICC ODI World Cup 2023 India Vs Australia : कोहली-राहुलनं लाज राखली, भारताचा ऑस्ट्रेलियावर ६ गडी राखून विजय
- Cricket World Cup २०२३ : टीम इंडियाची रणनीती यशस्वी, भारतीय फिरकी त्रिकुटासमोर कांगारूंनी टेकले गुडघे