ETV Bharat / sports

Cricket World Cup 2023 : भारतच विश्वचषकाचा दावेदार, 'या' युवा खेळाडूची विश्वचषकात मोठी कामगिरी

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 7, 2023, 9:10 AM IST

क्रिकेट विश्वचषकाचा भारत प्रबळ दावेदार असल्याचं मत भारताचे माजी गोलंदाज पंकज सिंग यांनी व्यक्त केलंय. संघातील युवा खेळाडूची विश्वचषकात मोठी कामगिरी असणार आहे. भारताकडं जागतिक दर्जाचे गोलंदाज आहे. ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनचा संघात समावेश केल्याने बळ मिळणार असल्याचंही सिंग यांनी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधी अश्विनी पारीख यांच्याशी खास संवाद साधताना म्हटलंय.

Cricket World Cup 2023
Cricket World Cup 2023

जयपूर (राजस्थान) : भारताचे माजी वेगवान गोलंदाज पंकज सिंग यांनी भारतीय संघाबाबत मोठं वक्तव्य केलंय. भारतीय संघात अष्टपैलू खेळाडू आहेत. त्यामुळं आयसीसी क्रिकेट विश्वचषकात ट्रॉफी जिंकण्यास मदत होणार असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. "गेल्या (2019) विश्वचषकाच्या तुलनेत यावेळी भारताची फलंदाजी अधिक संतुलित दिसतेय. त्यामुळं संघ विश्वचषकाचा पहिला दावेदार असल्याचं त्यांनी म्हटलंय. विश्वचषकात श्रेयस अय्यर, केएल (राहुल) उत्तम फलंदाजी करू शकतात. त्यामुळं संघात चौथा क्रमांक महत्त्वाचं असल्याचं पंकज सिंग यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधताना म्हटलंय.

टीम इंडिया लयीत : माजी वेगवान गोलंदाज पंकज सिंग पुढे बोलताना म्हणाले की, भारतासाठी दोन कसोटी, एक वनडे सामना खेळला आहे. यावेळी भारतीय संघात सर्व खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहेत. टीम इंडिया पूर्ण लयीत आहे. संघानं नुकताच आशिया चषक जिंकलाय. त्यामुळं संघाचा आत्मविश्वास आणखी वाढल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंच भारतीय टीमनं तीन दिवसीय सामन्यांच्या वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्याचं त्यांनी सांगितलं. मोहाली, इंदूरमध्ये विजय मिळवून भारतानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 2-1 ने जिंकली. तर, राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (SCA) स्टेडियमवर ऑस्ट्रेलियानं विजय नोंदवला होता असे देखील ते म्हणाले.

गिलनं केली प्रतिभा सिद्ध : ओपनिंगबद्दल बोलताना पंकज सिंग म्हणाले की, इशान किशननं, रोहित शर्मासोबत चांगली कामगिरी केली होती. शुभमन गिलनं देखील आपली प्रतिभा सिद्ध केली आहे. मधल्या फळीतील दिग्गज फलंदाज सूर्य कुमार यादव देखील चांगल्या फॉर्ममध्ये दिसतोय. मुंबईकर कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत सामना बदलू शकतात, असं देखील सिंग यांनी म्हटलंय. "सुर्या डेथ ओव्हर्समध्ये जलद धावा काढण्यासाठी ओळखला जातो," असं सिंग यांनी बोलताना सांगितलंय.

हार्दिक पांड्या अष्टपैलू खेळाडू : भारताच्या गोलंदाजीबद्दल बोलताना पंकज सिंग म्हणाले की, संघात मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराहसारखे जगातील सर्वोत्तम गोलंदाज आहेत. "आमच्याकडं हार्दिक पांड्या एक अष्टपैलू खेळाडू देखील आहे. तो 140 पेक्षा जास्त वेगानं सातत्यानं गोलंदाजी करतो. शार्दुल ठाकुर देखील चांगली कामगिरी करू शकतो. फिरकीपटूंबद्दल, रवींद्र जडेजाच्या उपस्थितीमुळं संघाला बळ मिळत असल्याचं सिंग यांनी सांगितलं.

अश्विनच्या आगमनानं संघाला बळकटी : "त्याचवेळी, कुलदीप यादव, टीम इंडियासाठी चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळं संघाला नेहमीच यश मिळवून देण्यात मदत होते. अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनला दुखापतग्रस्त अक्षर पटेलच्या जागी संघात स्थान देण्यात आलं आहे. अश्विनच्या आगमनानं संघाला बळकटी मिळाली आहे, असं पंकज सिंगचा विश्वास आहे. तथापि, चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या पहिल्या सामन्यासाठी, प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन फिरकी गोलंदाज असणं कठीण असल्याच मत देखील सिंग यांनी व्यक्त केलय.

भारताला देणार 'हे' संघ टक्कर : भारत विश्वचषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार आहे. पाच वेळा विश्वविजेता ऑस्ट्रेलिया, गतविजेता इंग्लंड, पाकिस्तानसह रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ उपांत्य फेरीत प्रवेश करेल, असा अंदाज सिंग यांनी वर्तवला आहे. उपांत्य फेरीचे सामने मुंबईतील वानखेडे स्टेडियम, कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवले जाणार आहे. पाकिस्तानची गोलंदाजी खूप मजबूत आहे. त्यांना भारतीय मैदान तसंच खेळपट्यांचा चागंला अनुभव आहे. त्यामुळं पाकिस्तानच्या संघाला देखील फायदा होण्याची शक्याता आहे, असं मत माजी गोलंदाज पंकज सिंग यांनी व्यक्त केलंय.

हेही वाचा -

  1. WORLD CUP 2023 : भारताच्या फलंदाजीसह, गोलंदाजीत काय आहे खास? कोणते खेळाडू करणार विश्वचषकात कहर, वाचा सविस्तर
  2. Asian Games २०२३ : चक दे इंडिया! आशियाई स्पर्धेत भारताची सुवर्ण कामगिरी, अंतिम सामन्यात जपानचा धुव्वा उडवला
  3. Cricket World Cup 2023 : 'राष्ट्रीय असो वा आंतरराष्ट्रीय, तो प्रत्येक सामना गांभीर्यानं घेतो'; धोनीच्या बालपणीच्या मित्राची 'ईटीव्ही भारत'ला खास मुलाखत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.