हैद्राबाद : Cricket World Cup 2023 : 2019 मध्ये आयपीएलच्या खराब हंगामात, भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला काही लोकांनी 'क्रिकेट सोडण्यास आणि वडिलांसोबत ऑटो चालवण्यास सांगितलं होतं. "मी चार षटकांत ४० धावा दिल्या, तर मला मनःशांती मिळणार नाही, हे जवळपास निश्चित झालं होतं. माला नाही जमलं, तर मी काहीतरी वेगळं काहीतरी करेल, असं सिराज म्हणाला होता.
कोलकाता नाईट रायडर्सचा सामना टर्निंग पॉइंट : गोलंदाज मोहम्मद सिराज सकाळी लवकर उठून व्यायाम करायचा करत असे. तसंच रोज गोलंदाजीचा सराव करायचा. त्यामुळं आयपीएल 2020 मध्ये तो खेळू शकला. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धचा सामना त्याच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला होता. त्या सामन्यात त्यानं तीन विकेट घेतल्या. ज्यामुळं त्याचा आत्मविश्वास वाढला. त्यानंतर 2020-21 च्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्धचं त्याचं पदार्पण कधीच विसरता येणार नाही.
वडील गंभीर आजारी : "त्यावेळी मोहम्मद सिराज म्हणाला होता. मला माझ्या आई-वडिलांना चांगलं जीवन द्याचंय. 'माझ्या वडिलांची प्रकृती 2020 पासून सतत खालावत होती. मी जेव्हा कधी त्याच्याशी बोलायचो तेव्हा, ते फोनवर भावूक होऊन रडायचे. त्यामुळं मी त्याच्याशी जास्त बोलत नव्हतो. त्यांना रडताना पाहून मला खूप असहाय्य वाटायचं. आयपीएल संपलं तेव्हा मला कोणीही सांगितलं, नाही की माझे वडील इतके गंभीर आजारी आहेत. जेव्हा मी फोन केला तेव्हा, ते वडिल विश्रांती घेत असल्याचं सांगण्यात आलं. अशा परिस्थितीत मला त्यांना त्रास द्यायचा नव्हता.
माझे चित्र वडिल वर्तमानपत्रातून जनत करायचे : 'मला त्याबद्दल आधी माहिती असती, तर कदाचित मी त्यांना भेटायला गेलो असतो. पण माझ्या करिअरवर परिणाम होऊ नये, अशी माझ्या कुटुंबाची इच्छा होती. देशासाठी खेळण्याचं माझं आणि माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याचं त्यांनी मला सुचवलं होतं.'' 'माझ्या चांगल्या कामगिरीनंतर माझे चित्र वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्यावर माझे वडील वृत्तपत्रातून ते कापून जतन करायचे. जेव्हा मी ऑस्ट्रेलियाला पोहोचलो तेव्हा मला कळले की वडिलांची प्रकृती खूप गंभीर आहे. त्यानंतर माझं कर्तृत्व न पाहता 2021 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना त्यांचा मृत्यू झाला, असं सिराजनं सांगितलं होतं.
संघर्षातून अनेकांना प्रेरणा : जेव्हा मी तिथे उभा राहून राष्ट्रगीत गात होतो (माझ्या कसोटी पदार्पणात), तेव्हा मला वाटत होतं की माझ्या वडिलांनी मला भारतीय संघाच्या जर्सीत पाहिलं असतं तर त्यांना किती अभिमान वाटला असता. त्यांचे शब्द नेहमी माझ्या कानात घुमतात, असही सिराज म्हणाला होता. मात्र, सिराजच्या केलेल्या संघर्षाचा युवकांसमोर आदर्श आहे. त्यांनं केलेल्या या संघर्षातून अनेकांना प्रेरणा मिळत आहे.
हेही वाचा -