लंडन - विश्वकरंडक स्पर्धेच्या पाचव्या सामन्यात आज बलाढ्य दक्षिण आफ्रिकेसमोर बांगलादेशचे आव्हान असणार आहे. पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागल्यानंतर आफ्रिकेचा संघ आजच्या सामन्यात कोणत्या रणनितीने उतरतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. वेगवान गोलंदाज डेल स्टेन पहिल्या सामन्यात खेळला नव्हता. परंतु, आजच्या सामन्यात तो खेळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ओव्हलच्या मैदानावर होणारा हा सामना दुपारी ३ वाजता सुरु होईल.
दुसरीकडे बांगलादेशचा संघ हा 'जायंट किलर' म्हणून ओळखला जातो. कोणत्याही संघावर वरचढ ठरण्याची क्षमता या संघात आहे. बांगलादेशकडे तमीम इक्बाल, लिटॉन दास, सौम्य सरकार, मुशफिकुर रहीम, महमुदुल्ला अशी चांगल्या फलंदाजांची फळी आहे. शिवाय शाकिब अल हसनसारखा अष्टपैलू खेळाडू संघात आहे. रुबेल हुसेन, मुस्ताफिजूर रेहमान यांसारखे अनुभवी गोलंदाजही आहेत.
दक्षिण आफ्रिकेचा संघ -
- फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अॅडेन मार्करम, क्विंटन डि कॉक (यष्टीरक्षक), हाशिम अमला, रॅसी वॅन डर ड्यूसेन, डेविड मिलर, एंडिले फेलुकवायो, जेपी ड्यूमिनी, ड्वेन प्रिस्टोरियस, डेल स्टेन, कगिसो रबाडा, लुंगी एनगिडी, ख्रिस मॉरिस, इमरान ताहिर, तब्रिज शम्सी.
बांगलादेशचा संघ -
- मश्रफे मोर्तझा (कर्णधार), तमीम इक्बाल, लिटॉन दास, सौम्य सरकार, मुशफिकुर रहीम, महमुदुल्ला, शाकिब अल हसन, मोहम्मद मिथुन, सब्बीर रेहमान, मोसद्देक हुसेन, मोहम्मद सैफुद्दीन, मेहदी हसन मिराज, रुबेल हुसेन, मुस्ताफिजूर रेहमान, अबू जायेद.