लंडन - यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने एका नविन भूमिकेत प्रवेश केला. 'सचिन ओपन्स अगेन' या कार्यक्रमातून त्याने समालोचकाच्या क्षेत्रात पदार्पण केले. दुपारी १.३० वाजता झालेल्या या कार्यक्रमात त्याच्यासोबत खेळलेल्या समकालीन खेळाडूंचा सहभाग होता.
सौरभ गांगुली, हरभजनसिंह आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यासोबत सचिनने सामन्याचे समालोचन केले. अनेक जुन्या आठवणींना हात घालत तिघांनी समालोचन केले. सचिनने ट्विटरवरुनही त्याच्या समालोचनाच्या अनुभवाचा फोटो शेअर केला आहे. हे सर्वजण पुन्हा एकत्र आल्याने ट्विटरवर त्यांचे फोटो खूप व्हायरल झाले आहेत.
![sachin tendulkar saurav ganguly sehwag](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/3434779_ugru9.jpg)
क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱया सचिन तेंडुलकरच्या नावावर विश्वकरंडक स्पर्धेत आजवर सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रम आहे. सचिनने १९९२ ते २०११ अशा ६ विश्वकरंडक स्पर्धेत भाग घेतला होता. त्याने खेळलेल्या ४४ सामन्यांमध्ये २,२७८ धावा केल्या आहेत. विश्वकरंडक स्पर्धेतील १५२ धावा ही सचिनची सर्वोच्च खेळी आहे. या खेळीत त्याने ६ शतके आणि १५ अर्धशतके ठोकली आहेत.
विश्वकरंडक स्पर्धेला ३० मे पासून इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरुवात झाली. या स्पर्धेत एकूण 10 देशांचे संघ विजेतेपदासाठी लढतील. या स्पर्धेत 30 मे ते 14 जुलै 2019 दरम्यान एकूण 48 सामने खेळले जाणार आहेत. जे 46 दिवस चालणार आहेत. स्पर्धेचा अंतिम सामना १४ जुलैला क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉडर्सच्या ऐतिहासिक मैदानावर होणार आहे.