मुंबई - विश्वकरंडक स्पर्धेत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर एका नव्या अवतारात दिसणार आहे. इंग्लंड आणि वेल्समध्ये रंगणाऱ्या या स्पर्धेत सचिन पहिल्यांदा समालोचकाची भूमिका साकारणार आहे.
'सचिन ओपन्स अगेन' अशा नावाच्या सेगमेंटमध्ये सचिन दिसणार आहे. हा सेगमेंट दुपारी १.५० वाजता होणार असून तो हिंदी आणि इंग्रजीमध्ये असेल. या शोमध्ये सचिनसोबत अन्य विश्लेषकही असणार आहेत.
क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱया सचिन तेंडुलकरच्या नावावर विश्वकरंडक स्पर्धेत आजवर सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रम आहे. सचिनने १९९२ ते २०११ अशा ६ विश्वकरंडक स्पर्धेत भाग घेतला होता. त्याने खेळलेल्या ४४ सामन्यांमध्ये २,२७८ धावा केल्या आहेत. विश्वकरंडक स्पर्धेतील १५२ धावा ही सचिनची सर्वोच्च खेळी आहे. या खेळीत त्याने ६ शतके आणि १५ अर्धशतके ठोकली आहेत.