नॉटिंगहॅम - भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ट्रेन्ट ब्रिज मैदानावर खेळण्यात येणाऱ्या सामन्यात पावसामुळे नाणेफेकीला उशीर होत आहे. स्थिती अशीच राहिल्यास सामन्यातील षटके कमी करण्याची दाट शक्यता आहे. या स्पर्धेत भारतीय संघाचा हा तिसरा तर न्यूझीलंडचा चौथा सामना असून दोन्ही संघानी आतापर्यंत झालेले सर्व सामने जिंकले आहेत.
विश्वकरंडक २०१९ क्रिकेट स्पर्धेत आतापर्यंत ३ सामने पावसामुळे रद्द करण्यात आले आहेत. यापूर्वी पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका, दक्षिण आफ्रिका विरुद्ध विंडीज आणि बांगलादेश विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सामने पावसामुळे रद्द झाले आहेत.