साउथैम्पटन- आयसीसी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आज बांग्लादेश आणि अफगाणिस्तान या दोन संघात सामना होणार आहे. हा सामना इंग्लंडच्या साउथैम्पटन शहरातील द रोज बोल मैदानावर दुपारी ३ वाजता खेळला जाणार आहे.
आत्तापर्यंत बांग्लादेश संघाने २ सामन्यात विजय मिळवला आहे. तर अफगाणिस्तानला आपल्या सगळ्या म्हणजे ६ सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मागील सामन्यात अफगाणिस्तानने भारताला जोरदार टक्कर दिली होती. त्यावेळेस केवळ ११ धावांनी अफगाणिस्तानचा पराभव झाला होता. तर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात बांग्लादेशने चांगले प्रदर्शन केले होते. ३८२ धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या बांग्लादेशने ५० षटकात ३३३ धावा केल्या. मात्र, त्यांना विजय मिळवता आला नाही.
त्यामुळे एकाही सामन्यात विजय न मिळवलेला अफगाणिस्तान बांग्लादेशला हरवून विजयाचे खाते उघडतो? की गोलंदाजीच्या जोरावर बांग्लादेश आपल्याकडे विजय खेचून आणतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
असे असतील खेळाडू
बांग्लादेश- मशरफे मोर्ताजा (कर्णधार), मुशफिकूर रहीम (यष्टीरक्षक), अबु जायेद, लिटन दास, महमदुल्लाह, मेहदी हसन, मोहम्मद मिथून, मोहम्मद सैफुद्दीन, मोसद्दिक होसैन, मुस्ताफिजूर रहमान, रूबेल होसैन, शब्बीर रहमान, शाकिब अल हसन, सौम्य सरकार, तमीम इकबाल.
अफगाणिस्तान- गुलबदीन नैब (कर्णधार) इकराम अली खिल (यष्टीरक्षक), नूर अली जाद्रान, हजरतुल्लाह जजई, रहमत शाह, असगर अफगान, हशमतुल्लाह शाहिदी, नजीबुल्लाह जादरान, समीउल्लाह शिनवारी, मोहम्मद नबी, राशीद खान, दौलत जादरान, आफताब आलम, हामिद हसन, मुजीब उर रहमान.