बर्मिंगहॅम - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात यजमान इंग्लंडने कट्टर प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाचा ८ गडी राखून एकतर्फी पराभव केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले असले तरी, अनुभवी स्टीव्ह स्मिथने मात्र एकट्याने किल्ला लढवत संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. या सामन्यात स्मिथ ८५ धावांवर असताना विचित्र पद्धतीने रनआऊट झाला.
या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियन संघ फलंदाजी करत असताना ४८ व्या षटकात स्मिथ धावबाद झाला. वोक्सच्या गोलंदाजीवर चोरटी धाव घेण्याच्या नादात स्मिथला इंग्लंडचा यष्टिरक्षक बटलरने रनआऊट केले. वोक्सने टाकलेला चेंडू स्मिथने पूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो यष्टीरक्षक बटलरकडे गेला. बटलरने तो चेंडू शिताफिने यष्ट्यांवर मारला. हा थ्रो इतका जबरदस्त होता की हा चेंडू स्मिथच्या पायाखालून जाऊन यष्ट्यांवर आदळला.
-
Have you ever seen a nutmeg run out? 😱
— ICC (@ICC) July 11, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Buttler's pin-point throw nails Smith! 🎯#WeAreEngland | #CWC19 pic.twitter.com/Z7QHKyNnDX
">Have you ever seen a nutmeg run out? 😱
— ICC (@ICC) July 11, 2019
Buttler's pin-point throw nails Smith! 🎯#WeAreEngland | #CWC19 pic.twitter.com/Z7QHKyNnDXHave you ever seen a nutmeg run out? 😱
— ICC (@ICC) July 11, 2019
Buttler's pin-point throw nails Smith! 🎯#WeAreEngland | #CWC19 pic.twitter.com/Z7QHKyNnDX
या रनआऊटचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या सामन्यात स्मिथ आणि केरी या दोघांनी शतकी भागिदारी करत संघाला शंभरीपार नेले होते. केरी ४६ धावांवर असताना आदिल रशिदने त्याला झेलबाद केले.