ETV Bharat / sports

धोनी ग्लोव्हज प्रकरण : गौतमचे आयसीसीला 'गंभीर' बोल - cricket world cup 2019

गौतम गंभीरने नोव्हेंबर 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

गंभीरने आयसीसीला खडे बोल सुनावले
author img

By

Published : Jun 8, 2019, 5:28 PM IST

नवी दिल्ली - आयसीसी विश्वकरंडकात ५ जुलै रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात महेंद्रसिंह धोनीने बलिदान बॅजचे चिन्ह असलेले ग्लोव्हज वापरले होते. यानंतर, आयसीसीच्या लक्षात ही बाब आल्यानंतर आयसीसीने बीसीसीआयला धोनीच्या ग्लोव्हजवरील चिन्ह हटवायला सांगितले होते.

या प्रकरणावर अनेक लोकांच्या प्रतिक्रीया उमटल्या होत्या. माजी क्रिकेटपटू आणि नवनिर्वाचीत खासदार गौतम गंभीरनेही यावर आपले मत प्रकट केले आहे. त्याने आयसीसीला 'गंभीर' बोल सुनावले आहेत.

ms dhoni
धोनी ग्लोव्हज प्रकरण

"जगभरात क्रिकेटचा प्रसार कसा होईल याचा आयसीसीने विचार करावा. कोण कोणता ग्लोव्हज घालतोय, त्यावर कोणता लोगो आहे, हे तुमचे काम नाही,'' अशा शब्दात गंभीरने आयसीसीला खडे बोल सुनावले आहेत.

गंभीर पुढे म्हणाला, ''एका सामन्यात 300-400 धावा होता कामा नये, याकडे आयसीसीने लक्ष द्यायला हवे. गोलंदाजांना मदत करणाऱ्या खेळपट्ट्या आयसीसीने तयार करायला हव्यात. प्रत्येकवेळी फलंदाजांना पोषक खेळपट्ट्या असता कामा नये. लोगोचा जो काही वाद निर्माण झाला किंवा केला गेला इतका गरजेचा नव्हता.''

गौतम गंभीरने नोव्हेंबर 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो सध्या भाजपचा खासदार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.