लंडन - क्रिकेटचा कुंभमेळा समजल्या जाणाऱ्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाने धडाकेबाज सुरुवात केली आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेवर ६ गडी राखून विजय मिळवला. रोहित शर्माच्या दमदार शतकी खेळीच्या जोरावर भारताला विजयाचे लक्ष गाठता आले. रोहितने १४४ चेंडुमध्ये १२२ धावा केल्या. त्याला सामनावीराचा किताबही देण्यात आला.
उद्या होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघ कसून सराव करतोय. संघाचे सर्वच खेळाडू जिममध्ये घाम गाळत आहेत. यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने यासंबंधी एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये हार्दिक पांड्या, केदार जाधव, लोकेश राहुल, विजय शंकर आणि रविंद्र जडेजा दिसून येत आहेत.
मागील सामन्यात शतक ठोकलेल्या रोहीत शर्माने युजवेंद्र चहलसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. 'चहल बाबू, खूप छान गोलंदाजी केलीस, पण स्वत: चे दात जप', असे रोहीतने त्या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.