ETV Bharat / sports

"फिक्सींग करणाऱ्या धोनीला असाच अपमानजनक निरोप मिळायला हवा"

फवाद यांनी 'धोनीच्या नशिबात अशाप्रकारे अपमान होऊन बाहेर पडणेच होते', असे आक्षेपार्ह  विधान केले आहे.

"फिक्सींग करणाऱ्या धोनीला असाच अपमानजनक निरोप मिळायला हवा"
author img

By

Published : Jul 13, 2019, 7:01 AM IST

मँचेस्टर - आयसीसी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या व उत्कंठावर्धक ठरलेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने भारताचा १८ धावांनी पराभव केला. या पराभवाबरोबरच विश्वविजेतेपदाचे भारताचे स्वप्न भंगले आहे. या सामन्यात धोनी आणि जडेजाने पराभव टाळण्याचा प्रयत्न केला पण त्यांना अपयश आले. भारताच्या पराभवामुळे पाकिस्तानच्या चाहत्यांना आनंद झाला असून सोशल मीडियावर त्यांनी जल्लोष साजरा केला आहे. या चाहत्यांमध्ये इम्रान खान यांच्या मंत्रीमंडळातील नेते फवाद अहमद हुसैन हे सुद्धा सामिल झाले असून त्यांनी भारताचा यष्टीरक्षक फलंदाज धोनीबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे.

फवाद यांनी 'धोनीच्या नशिबात अशाप्रकारे अपमान होऊन बाहेर पडणेच होते', असे आक्षेपार्ह विधान केले आहे. शिवाय, "फिक्सींग करणाऱ्या धोनीला असाच अपमानजनक निरोप मिळायला हवा" हे पाक चाहत्याने केलेले ट्विट फवाद यांनी रिट्वीट केले आहे.

fawad hussain
"फिक्सींग करणाऱ्या धोनीला असाच अपमानजनक निरोप मिळायला हवा" हे पाक चाहत्याने केलेले ट्विट फवाद यांनी रिट्वीट केले आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात भारताच्या टॉप फलंदाजांनी न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजीसमोर गुडघे टेकले. तेव्हा महेंद्रसिंह धोनीने संघाची पडझड रोखली. त्याने जडेजासोबत सातव्या विकेटसाठी ११६ धावांची भागिदारी केली. धोनी आणि जडेजाच्या भागिदारीने भारत पुन्हा सामन्यात परतला. मात्र धोनीचे प्रयत्न भारताला विजय मिळवू शकले नाहीत. आणि शेवटी भारताचा पराभव झाला.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.