नॉटिंगहॅम - ट्रेंट ब्रिज क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात वेस्ट इंडिजने पाकिस्तानचा धुव्वा उडवत ७ गडी राखून विजय मिळवला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांसमोर अक्षरश: लोटांगण घातले. वेस्ट इंडिजच्या वेगवान माऱ्यासमोर पाकिस्तानचा संपूर्ण संघ अवघ्या १०५ धावांवर गारद झाला.
यावेळी विंडीजकडून आक्रमक फलंदाज ख्रिस गेलने ३4 चेंडूत 50 धावांची अर्धशतकी खेळी करत विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. यावेळी 'युनिव्हर्सल बॉस' म्हणून संबोधल्या जाणाऱ्या ख्रिस गेलने एक विक्रम केला आहे.वनडेत सलग 6 डावात 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारा तो वेस्ट इंडिजचा दुसराच खेळाडू ठरला आहे. गॉर्डन ग्रीनीज यांनी, असा विक्रम पूर्वी केला होता. 1979-1980 च्यादरम्यान सलग सहा वनडे डावात 50 धावा केल्या आहेत.गेलने पाकिस्तानविरुद्ध केलेल्या खेळीमध्ये 6 चौकार आणि 3 षटकार मारले. विशेष म्हणजे पाकिस्तानच्याच जावेद मियाँदाद यांनी सलग 9 डावात 50 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.