ETV Bharat / sports

WC२०१९ : भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाक कर्णधाराची खेळाडूंना 'वॉर्निंग' - india

भारताविरुद्धच्या 'हायहोल्टेज' सामन्यात कोणताही बहाना चालणार नसल्याचे सर्फराज अहमद याने आपल्या खेळाडूंना सांगितले आहे.

पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद
author img

By

Published : Jun 13, 2019, 8:06 PM IST

नवी दिल्ली - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेमध्ये काल (बुधवार) झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान या सामन्यामध्ये पाकिस्तानला ४१ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. पाकिस्तानचा पुढचा सामना भारताबरोबर होणार असून या सामन्यापूर्वी कर्णधार सर्फराज अहमदने आपल्या खेळाडूंना 'वार्निंग' दिली आहे. भारताविरुद्धच्या 'हायहोल्टेज' सामन्यात कोणताही बहाना चालणार नसल्याचे त्याने खेळाडूंना सांगितले आहे.

ऑस्ट्रेलिया विरोधात झालेल्या सामन्यानंतर बोलताना कर्णधार सर्फराजने सांगितले की, आम्ही या सामन्यात सगळ्याच क्षेत्रात चुका केल्या. मी संघाच्या क्षेत्ररक्षणावर निराश आहे. मात्र, भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी आम्हाला सुधारण्याची आवश्यकता आहे. यासाठी आम्हाला कष्ट करण्याची गरज असून भारतासोबतच्या सामन्यात कोणतीही सबब चालणार नसल्याचे, त्याने सांगितले.

आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेमध्ये पाकिस्तानने ४ सामने खेळले आहेत. यामध्ये पाकिस्तानने एका सामन्यात विजय मिळवला आहे तर २ सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तर राहिलेला एक सामना पावसामुळे होऊ शकलेला नाही. पाकिस्तानचा पुढील सामना १६ जूनला भारताशी होणार आहे. या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदने आपल्या खेळाडूंना 'वॉर्निग' दिली आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.