ETV Bharat / sports

इंग्लंडचा बेन स्टोक्स म्हणतो, 'हा' आहे खरा ‘न्यूझीलंडर ऑफ द इयर’चा दावेदार

स्टोक्सने न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला खरा ‘न्यूझीलंडर ऑफ द इयर’चा दावेदार म्हटले आहे.

author img

By

Published : Jul 23, 2019, 5:56 PM IST

इंग्लंडचा बेन स्टोक्स म्हणतो, 'हा' आहे खरा ‘न्यूझीलंडर ऑफ द इयर’चा दावेदार!

लंडन - यंदाची आयसीसी विश्वकरंडक स्पर्धा इंग्लंडने जिंकली. इंग्लंडला पहिलेवहिले जगज्जेतेपद मिळवून देण्यामध्ये अष्टपैलू बेन स्टोक्सचे मोठे योगदान होते. स्टोक्सच्या या कामगिरीमुळे त्याला न्यूझीलंडच्या प्रतिष्ठित ‘न्यूझीलंडर ऑफ द इयर’ पुरस्कारासाठी नामांकनही मिळाले आहे. पण, स्टोक्सने आपले मत दुसऱ्याला दिले आहे. त्याने न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला खरा ‘न्यूझीलंडर ऑफ द इयर’चा दावेदार म्हटले आहे.

kane williamson
केन विल्यमसन

स्टोक्स म्हणाला, 'मी या नामांकनासाठी फार खूष आहे. मला न्यूझीलंडचा अभिमानही आहे. पण मी या नामांकनासाठी योग्य नाही. खूप व्यक्ती आहेत ज्यांनी न्यूझीलंडसाठी मोठे योगदान दिले आहे.' तो पुढे म्हणाला, 'या पुरस्कारासाठी मी माझे मत न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला देतो. तो दिग्गज आहे. या महान माणसाने संघाचे नेतृत्व गौरवाने आणि सन्मानाने केले. तो मालिकावीर आहे आणि लोकांनी त्याला निवडले पाहिजे.'

इंग्लंडच्या बेन स्टोक्सने विश्वकरंडकाच्या अंतिम सामन्यात 84 धावांची झुंजार खेळी साकारत इंग्लंडला पहिला-वहिला विश्वकरंडक मिळवून दिला आहे. स्टोक्ससोबत न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनलाही ‘न्यूझीलंडर ऑफ द इयर’चे नामांकन मिळाले आहे. विल्यमसनलाही यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेसाठी मालिकावीराचा पुरस्कार मिळाला आहे. न्यूझीलंडच्या असलेल्या व्यक्तीने एखादे मोठे कार्य केले तर त्याची दखल घेत हा सन्मान दिला जातो.

न्यूझीलंडच्या ऑकलंड येथे दरवर्षी फेब्रुवारीमध्ये हा पुरस्कार दिला जातो. ऑस्ट्रेलियाच्या जेफरी जॉन हॉप यांनी 2010 मध्ये हा पुरस्कार सुरू केला होता. 28 वर्षीय बेन स्टोक्स हा मूळचा न्यूझीलंडचा आहे. त्याचे वडील अँड्रय़ू स्टोक्स यांची इंग्लंडच्या वोकिंग टाऊन रग्बी संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर स्टोक्स कुटुंबीय इंग्लंडला स्थायिक झाले. स्टोक्सने 2011 मध्ये इंग्लंडकडून एकदिवसीय क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली.

Intro:Body:

इंग्लंडचा बेन स्टोक्स म्हणतो, 'हा' आहे खरा ‘न्यूझीलंडर ऑफ द इयर’चा दावेदार!

लंडन - यंदाची आयसीसी विश्वकरंडक स्पर्धा इंग्लंडने जिंकली. इंग्लंडला पहिलेवहिले जगज्जेतेपद मिळवून देण्यामध्ये अष्टपैलू बेन स्टोक्सचे मोठे योगदान होते. स्टोक्सच्या या कामगिरीमुळे त्याला न्यूझीलंडच्या प्रतिष्ठित ‘न्यूझीलंडर ऑफ द इयर’ पुरस्कारासाठी नामांकनही मिळाले आहे. पण, स्टोक्सने आपले मत दुसऱयाला दिले आहे. त्याने न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला खरा ‘न्यूझीलंडर ऑफ द इयर’चा दावेदार म्हटले आहे.

स्टोक्स म्हणाला, 'मी या नामांकनासाठी फार खूष आहे. मला न्यूझीलंडचा अभिमानही आहे. पण मी या नामांकनासाठी योग्य नाही. खूप व्यक्ती आहेत ज्यांनी न्यूझीलंडसाठी मोठे योगदान दिले आहे.'  तो पुढे म्हणाला, 'या पुरस्कारासाठी मी माझे मत न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला देतो. तो दिग्गज आहे. या महान माणसाने संघाचे नेतृत्व गौरवाने आणि सन्मानाने केले. तो मालिकावीर आहे आणि लोकांनी त्याला निवडले पाहिजे.'

इंग्लंडच्या बेन स्टोक्सने विश्वकरंडकाच्या अंतिम सामन्यात 84 धावांची झुंजार खेळी साकारत इंग्लंडला पहिला-वहिला विश्वकरंडक मिळवून दिला आहे. स्टोक्ससोबत न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनलाही ‘न्यूझीलंडर ऑफ द इयर’चे नामांकन मिळाले आहे. विल्यमसनलाही यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेसाठी मालिकावीराचा पुरस्कार मिळाला आहे. न्यूझीलंडच्या असलेल्या व्यक्तीने एखादे मोठे कार्य केले तर त्याची दखल घेत हा सन्मान दिला जातो. 

न्यूझीलंडच्या ऑकलंड येथे दरवर्षी फेब्रुवारीमध्ये हा पुरस्कार दिला जातो. ऑस्ट्रेलियाच्या जेफरी जॉन हॉप यांनी 2010 मध्ये हा पुरस्कार सुरू केला होता. 28 वर्षीय बेन स्टोक्स हा मूळचा न्यूझीलंडचा आहे. त्याचे वडील अँड्रय़ू स्टोक्स यांची इंग्लंडच्या वोकिंग टाऊन रग्बी संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर स्टोक्स कुटुंबीय इंग्लंडला स्थायिक झाले. स्टोक्सने 2011 मध्ये इंग्लंडकडून एकदिवसीय क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.