नवी दिल्ली - भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरला आणखी एक नवीन चॅलेंज दिले आहे. या नव्या चॅलेंजमध्ये तो डोळ्यावर काळी पट्टी बांधून लाटणीने चेंडूला टोलवत आहे.
युवराजने सचिनला हा चेंडू 100 वेळा टोलवण्याचे चॅलेंज दिले आहे. युवी म्हणाला, "मास्टर, तुम्ही क्रिकेटच्या मैदानावर बरेच विक्रम मोडले आहेत. पण आता स्वयंपाकघरात माझ्या शतकाचा विक्रम तुम्हाला मोडायचा आहे. माफ करा, प्रक्रिया मोठी असल्यामुळे मी पूर्ण व्हिडिओ शेअर केला नाही. मी आशा करतो की आपण स्वयंपाकघरातील इतर वस्तू मोडणार नाहीत."
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
तत्पूर्वी, युवराजनेही सचिनला यापूर्वीही आव्हान दिले होते. त्यावेळी युवीचे चॅलेंज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सहज पूर्ण केले होते. विशेष म्हणजे, सचिनने युवीचे चॅलेज पूर्ण करताना चक्क डोळ्यावर पट्टी बांधली.
भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंहने सोशल मीडियावर #KeepItUpchallenge ही मोहीम सुरू केली होती. त्याने त्यासाठी सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा आणि हरभजन सिंग यांना नॉमिनेट केले होते.